Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकासमोर सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करणार, शिवप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावं – उद्धव ठाकरे

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नाही, याविरोधात सरकारला जोडेमारो आंदोलन करणार आहोत. माजी राज्यपाल कोश्यारी यांचं ऑफिस समुद्रकिनारी होतं, वाऱ्याने त्यांची कधी टोपी उडाली नाही, यांचे मंत्री म्हणतात हवेने पुतळा पडला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदत लगावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 28, 2024 | 02:17 PM
1 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकासमोर सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करणार, शिवप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावं

1 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकासमोर सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करणार, शिवप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावं

Follow Us
Follow Us:

मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळाल कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आली. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते राजकोटला किल्ल्यावर पोहोचले आहेत. त्यावेळी नारायण राणे आणि नीलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्यावर पोहोचले असता, त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाच्या या राजकारणाविरोधात महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सिंधुदुर्गातील राड्यानंतर महाविकास आघाडीचे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.उद्धव ठाकरे म्हणाले की,राज्यातलं सरकार हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे आणि कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण न्यायालयाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली गेली. मालवणमध्ये पुतळा कोसळल्यानंतर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्याकडून मोर्चा करण्यात आला. मात्र त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आडवे आले. ते शिवद्रोही आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकारने आपल्या बेफिकीरपणामुळे पुतळा उभारला असून त्याचे परिणाम निर्लज्जपणे भोगावे लागणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतः शिवाजी महाराजांचा अपमान केला असता. पण कोश्यारीची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, ‘काही तरी चांगल घडेल. त्यामुळी आम्ही आता ठरवलं आहे की, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या गेटवर जाऊन सरकारचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही गुन्हा दाखल करणार असाल, याचा अर्थ तुम्ही गुन्हा घडला हे मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? मोदी आले त्यांचे हस्ते अनावर झालं, याचा अर्थ त्यांचा संबंध आला. पण नौदल आपलं एवढं पोकळ आहे का? ते समुद्राशीच खेळत असतात. त्यामुळे जबाबदारी टाकून नौदलावर टाकून मोकळे होणार आहात का? किती वेगाने वारे वाहणार हे नौदलाला माहीत नव्हतं का? खरं तर निवडणूका होत्या आणि कोकण जिंकायचं यासाठी हा घाट घातला, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

Web Title: Bjp vs mahavikas aghadi uddhav thackeray on protest against the government in front of the martyrs memorial on september 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 01:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  • maharashtra
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
2

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
4

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.