
मुंबईत कमळ फुललं! बीएमसीवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर; मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.... (Photo Credit- X)
विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना कॉल करून त्यांचे विशेष अभिनंदन केले. “अमित, तुमचे मनापासून अभिनंदन! तुम्ही खूप चांगले काम केले आहे, हे यश जबरदस्त आहे. आता कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी साटम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
#WATCH | Maharashtra civic body elections | CM Devendra Fadnavis calls up Mumbai BJP president Ameet Satam and congratulates him, as the BJP-Shiv Sena Mahayuti leads in the BMC elections. (Video Source: Maharashtra CMO) pic.twitter.com/cEB0hSTm8z — ANI (@ANI) January 16, 2026
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बीएमसीवर आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा भाजपने मुसंडी मारत हे वर्चस्व मोडीत काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, “मेट्रो, कोस्टल रोड आणि ट्रान्स-हार्बर लिंक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या कामावर मुंबईकरांनी विश्वास टाकला आहे.”
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या विजयाचे स्वागत केले. “हा जनादेश मुंबईच्या बदलत्या रूपासाठी दिला गेला आहे. कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य केले आहे, त्याचाच हा परिणाम आहे,” असे नार्वेकर म्हणाले.
विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी ७ वाजता नागपुरात पोहोचणार आहेत. तिथे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विजयाचा आनंद साजरा करतील आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा करतील.
Who will be Mumbai’s new mayor: कोण होणार मुंबईचा नवा महापौर…? ‘या’ मराठी नावाची आहे चर्चा