सौजन्य - नवराष्ट्र टीम
सुभाष नाणेकर हे उत्तमनगरचे संरपंचही होते. गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. भाजपमधील बडे नेतेही नाणेकर यांच्यासाठी प्रचाराला आले होते. त्यांच्या विरोधातील उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला होता. मात्र जनतेने नाणेकर यांना निवडून दिले आहे. संरपंचपदी असताना नाणेकर यांनी उत्तमनगर भागातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत, नगरसेवक झाल्यानंतर या भागात मोठा विकास होईल, असं त्यांच्या समर्थकांकडून बोललं जात होतं. नाणेकर यांचा विजय झाल्यामुळे या भागाचा विकास होईल का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसाखाली नाणेकर यांनी नवराष्ट्रला मुलाखत दिली होती. नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. पाण्याचा प्रश्न मिटवणार असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली होती. तसेच मी सरपंच असताना उत्तमनगर भागात अनेक नागरिकांच्या सोडविल्या, असंही त्यांनी सांगितलं होतं. नाणेकर हे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी
भाजप पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेणार असं दिसत आहे. कारण आतापर्यंत समोर आलेले कल पाहता भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होणार अशी आशा सर्वांना होती. पण तसे काही दिसले नाही, कारण भाजप एकहाती सत्ता आणणच्या तयारीत आहे. दादांनी आपली सगळी ताकद लावलेली पण मतदारांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकलेला दिसत आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून, भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.






