Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election: उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप अधिकृत युतीची घोषणा केलेली नसली, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या काही संयुक्त बैठका सातत्याने सुरू आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2025 | 09:37 AM
Maharashtra Politics : 'उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते...'; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Maharashtra Politics : 'उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते...'; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीत नव्या पिढीला संधी देण्याची रणनीती
  • शिवसेनेकडून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही,
  • ठाकरे गटाकडून सुमारे ७० टक्के उमेदवार हे नवे चेहरे
BMC Election: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत

महापालिका निवडणुकीत नव्या पिढीला संधी देण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे अनेक अनुभवी नगरसेवकांची नाराजी ओढावली जाण्याची शक्यता असून काहींनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे. आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटातील अंतर्गत समीकरणांवर आणि महापालिका निवडणुकीच्या रणनितीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटात नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याची तयारी सुरू आहे. ज्येष्ठ नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नसली, तरी माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना तिकिट देण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरू आहे. या धोरणामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाकडून सुमारे ७० टक्के उमेदवार हे नवे चेहरे असतील.  या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आगामी निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तसेच स्थानिक पातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे समजते.

Mumbai Crime: भिवंडीत अमानुष कृत्य! 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

ठाकरे-राज ठाकरे युतीवर अजून निर्णय नाही

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप अधिकृत युतीची घोषणा केलेली नसली, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या काही संयुक्त बैठका सातत्याने सुरू आहेत. या बैठकीत प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद, प्रभाव आणि स्थानिक गणितांचा विचार करून जागावाटपाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिवसेनेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ८४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने आता त्यांच्या जागी नवीन चेहरे उतरवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या माजी नगरसेवकांना या वेळी उमेदवारी देण्यात येणार नाही.

तथापि, संबंधित वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्या माजी नगरसेवकांचा अनुभव आणि पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. या निर्णयामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या चौकटीत राहून लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “आपापल्या मतदारसंघांमध्ये सक्रियपणे फिरा, संघटन मजबूत करा आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागा. अगदीच जिथे मतभेद जुळून येत नसतील, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू. मात्र, इतर सर्व ठिकाणी निवडणूक महायुतीच्या नावानेच लढवली जाईल.” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Bmc election uddhav thackeray groups big decision senior corporators addresses will be cut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘…ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार’; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान
1

‘…ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार’; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं
2

Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं

Maharashtra Politics : ‘उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते…’; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान
3

Maharashtra Politics : ‘उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते…’; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.