Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

बोरिवली तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल्यांच्या पडताळणीदरम्यान बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 02:10 PM
बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

Follow Us
Follow Us:
  • उत्पन्न दाखल्यांच्या सुमारे ३० अर्जांमध्ये बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा संशय.
  • प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल; सायबर पोलिसांकडून तपास सुरू.
  • नागरिकांनी केवळ अधिकृत प्रक्रियेद्वारेच दाखल्यांसाठी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
बोरिवली तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल्यांसाठी प्राप्त झालेल्या काही अर्जाच्या पडताळणीदरम्यान तलाठी कार्यालयाचे कथित बनावट शिक्के आणि तलाठ्यांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासात सुमारे ३० अर्जामध्ये संशयास्पद बाबी आढळल्याने बोरीवली तहसील प्रशासनाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

बोरिवली तहसील कार्यालयात आलेल्या उत्पन्न दाखल्यांच्या अजाँची नियमित पडताळणी करताना काही अर्जावरील शिक्के आणि स्वाक्षऱ्यांबाबत अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर संबंधित कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात आली. या छाननीत सुमारे ३० अर्जामध्ये वापरण्यात आलेले शिक्के व स्वाक्षऱ्या संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बोरिवलीच्या तहसीलदार संयोगिता बाविस्कर यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, संबंधित प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.

अधिकृत प्रक्रियेद्वारेच अर्ज सादर करा

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटच्या माध्यमातून कागदपत्रे तयार करून न घेता, केवळ अधिकृत प्रक्रियेद्वारेच दाखल्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे केले सादर

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्यात आले होते. त्यामुळे अर्ज अपलोड करण्यासाठी वापरण्यात आलेले डिजिटल आयडी आणि आयपी अँड्रेसच्या आधारे तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून काही ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधील नोंदींची पडताळणी तसेच संबंधित व्यक्तींकडून माहिती घेतली जात असल्याचे समजते. मात्र, या प्रकरणात कोणाचीही जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Mumbai News: लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला ‘टिपिंग पॉइंट’ वर

कठोर कारवाईचा इशारा

याबाबत तहसीलदार संयोगिता बाविस्कर यांनी सांगितले की, ‘शासकीय कामकाजात पारदर्शकता अत्यंत महत्वाची आहे. बनावट कागदपत्रे किंवा खोट्या स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Borivali tehsil fake stamp income certificate forgery cyber police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Borivali
  • NAVARASHTRA
  • tehsil office

संबंधित बातम्या

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
1

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास
2

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
3

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
4

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.