Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

दुधाचे दर घसरल्यानंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी श्रीरामपूर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शासनाने खटला मागे घेण्यास मंजुरी दिल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता करत शेतकरी संघटनेला मोठा दिलासा दिला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2026 | 01:43 PM
Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Follow Us
Follow Us:
  • दूध दर आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपींची श्रीरामपूर न्यायालयाने मुक्तता केली.
  • शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने खटला मागे घेण्यास मंजुरी दिली.
  • न्यायालयाने सर्व आरोपींचे जामीनबंधही रद्द करत खटला अधिकृतपणे निकाली काढला.
श्रीरामपूर: दुधाचे दर अचानक प्रतिलिटर १० ते १५ रुपयांनी घसरले होते. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या अन्यायाविरुद्ध आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने रस्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर रस्ता अडवल्याचा ठपका ठेवत श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अखेर या खटल्यातून सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.

Dombivli News: ‘बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल’; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ३४१ (सदोष अवरोध), १४३ (बेकायदेशीर जमाव), १८८ (सरकारी आदेशाचा भंग) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ चे कलम १३५ अन्वये श्रीरामपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी शासन निर्णयाचा आधार घेत हा खटला मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी (अहिल्यानगर) आणि पोलीस अधीक्षक (अहिल्यानगर) यांच्याकडे सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश येत शासनाने खटला मागे घेण्यास मंजुरी दिली.  (फोटो सौजन्य – AI Created)

शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत

न्यायालयाच्या या सकारात्मक निर्णयाचे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रूपेंद्र काले, सुदामराव औताडे, डॉ. दादासाहेब आदिक, गोविंद वाघ, संतोष पटारे, सतीश नाईक, डॉ. विकास नवले, कडू पवार, नारायण पवार, इंद्रभान चोरमल, समिर रोकडे, शिवाजी पटारे, अनिल कवडे, शिवाजी दांगट, दत्ता जानराव, प्रभाकर कांबळे, सोपानराव येळे, सर्जेराव देवकर, बंडू पाटील पटारे, कार्लस साठे, अशोक टेकाळे, नारायण टेकाळे, ईश्वर दरंदले आदींसह दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले.

या विधिज्ञांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली

वादी पक्षाकडून महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी केले. तर प्रतिवादी तथा आरोपी म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल प्रभाकर औताडे, अजित काळे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल, सागर गिद्धे, अनिल रोकडे आणि प्रकाश ताके या शेतकरी नेते व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्व आरोपींच्या वतीने ॲड. संदीप चोरमल, शेतकरी संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. प्रशांत कापसे आणि ॲड, धनवटे यांनी कायदेशीर बाजू मांडली.

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ

न्यायालयाचा अंतिम आदेश

श्रीरामपूर न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी वर्ग-१ जितेंद्र द. जाधव यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम ३२१ अन्वये अर्ज सादर करून सार्वजनिक हित, समाजामध्ये सलोखा आणि सौहार्द कायम राखण्याच्या उद्देशाने हा खटला मागे घेण्याची परवानगी न्यायालयाला मागितली. न्यायदंडाधिकारी जितेंद्र द. जाधव यांनी १५ जुलै २०२६ रोजी आदेश दिला की, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम ३२१ (ब) अन्वये सर्व आरोपींची या खटल्यातून मुक्तता, जामीनबंध रद्द करण्यात येत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ahilyanagar news shrirampur milk rate protest case all farmer accused acquitted by court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Currency Printing Cost: कागदी नोटा बंद होणार? प्लास्टिक नोटा छापण्यासाठी सरकारला मोजावे लागणार जास्त पैसे; नेमका प्लॅन काय?
1

Currency Printing Cost: कागदी नोटा बंद होणार? प्लास्टिक नोटा छापण्यासाठी सरकारला मोजावे लागणार जास्त पैसे; नेमका प्लॅन काय?

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय
2

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च
3

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा
4

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.