Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Road News: 11 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

मीरा रोडमधील विनय नगर परिसरात टॉवर क्रेन कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे, तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 10:32 AM
Mira Road News : 16 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

Mira Road News : 16 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा चक्काचूर

Follow Us
Follow Us:
  • मीरा रोडच्या विनय नगरमध्ये 11 व्या मजल्यावरील टॉवर क्रेन कोसळून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
  • क्रेन शेजारच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने अनेक चारचाकी वाहनांचा चक्काचूर झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
  • घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.
विजय काते

मीरा रोडच्या विनय नगर परिसरात गुरुवारी (16 जुलै) सायंकाळी घडलेल्या भीषण क्रेन दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले. जेके आयरीस (JK Iris) या निवासी संकुलालगत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकामादरम्यान उभारण्यात आलेली बांधकाम साहित्य वाहून नेणारी टॉवर क्रेन अचानक कोसळून लगतच्या सोसायटीच्या आवारात पडली. या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर स्वच्छ; बारामती नगरपरिषदेची अभूतपूर्व कामगिरी

प्राथमिक माहितीनुसार, विनय नगर येथील जेके आयरीस इमारतीलगत एका खासगी विकासकाकडून बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या सुमारे 11 व्या मजल्यावरून बांधकाम साहित्य वर नेण्यासाठी वापरण्यात येणारी टॉवर क्रेन अचानक कोसळली. क्रेनचा मोठा भाग थेट शेजारील जेके आयरीस सोसायटीच्या पार्किंगमध्ये पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेच्या वेळी परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिक घराबाहेर धावत आले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक कार आणि इतर वाहनांवर क्रेन कोसळल्याने त्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुरुवातीला अनेक नागरिक क्रेनखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या दुर्घटनेत 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनखाली कोणी अडकले आहे का, याची तपासणी करण्यात आली. जेसीबी, हायड्रा क्रेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. परिसराला सुरक्षा घेरा घालून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

घटनेनंतर मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. भाजप नेते नरेंद्र मेहता यांनीही अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे. या अपघातास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे स्पष्ट केले.

Mumbai Local सुरक्षित राहिली का? सीटवरून वाद, लोकलमध्ये कोयत्याने थरार! ठाकुर्लीजवळ प्रवाशावर जीवघेणा हल्ला; तिघे फरार

दरम्यान, क्रेन कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक बिघाड, निष्काळजीपणा किंवा सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाले होते का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित विकासक, कंत्राटदार आणि क्रेन ऑपरेटर यांच्या भूमिकेची चौकशी केली जात असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. भीषण दुर्घटनेमुळे मीरा रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील उंच इमारतींच्या बांधकामांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेनंतर बांधकामस्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Tower crane collapse from 16th floor in floor one dead one injured vehicles damaged in the incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:45 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mira Road
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
1

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
3

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
4

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.