Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jogeshwari News: जोगेश्वरीत FDA ची धडक कारवाई; १०.९४ लाखांचा विनालेबल साबण जप्त

मुंबईतील जोगेश्वरी येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत १०.९४ लाख रुपये किमतीचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त केला आहे. या प्रकरणात संबंधित विक्रेत्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 01:27 PM
Jogeshwari News: जोगेश्वरीत एफडीएची धडक कारवाई; १०.९४ लाखांचा विनालेबल साबण जप्त

Jogeshwari News: जोगेश्वरीत एफडीएची धडक कारवाई; १०.९४ लाखांचा विनालेबल साबण जप्त

Follow Us
Follow Us:
  • जोगेश्वरीतील दुकानातून १०.९४ लाखांचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त.
  • उत्पादनांवर बॅच नंबर, उत्पादन दिनांक आणि उत्पादकाची माहिती नव्हती.
  • साबणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून विक्रेत्यावर कारवाई सुरू.
ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील जोगेश्वरी येथील एका विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी (पश्चिम) येथील जे. के. सोप बाजार या आस्थापनातून तब्बल १० लाख ९३ हजार ६९२ रुपये किमतीचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या मुंबई विभागाच्या पथकाने मंगळवारी केलेल्या छाप्यात संबंधित आस्थापनात मोठ्या प्रमाणावर टॉयलेट साबण साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले, मात्र या उत्पादनांवर कायद्याने बंधनकारक असलेली बॅच किंवा लॉट क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, उत्पादन परवाना क्रमांक तसेच उत्पादकाचे नाव व पत्ता यासारखी अत्यावश्यक माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारची लेबलविरहित उत्पादने बाजारात विक्रीसाठी ठेवणे हे ग्राहकांची दिशाभूल करणारे असून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Metro 3 Update: मेट्रो-३ भुयारी मार्गिकेत आता अखंड मोबाईल नेटवर्क, प्रवाशांना मोठा दिलासा

साबणाचे नमुने विश्लेषणासाठी पाठवले

उत्पादनाचा स्रोत, गुणवत्ता, सुरक्षितता आणि उत्पादकाची जबाबदारी याबाबत कोणतीही खात्री देता येत नसल्याने ग्राहकांसाठी गंभीर धोका निर्माण होतो. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या साबणाची एकूण किमत १० लाख ९३ हजार ६९२ रुपये इतकी असून पुढील तपासासाठी साबणाचे दोन नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणात नधी उल्लाह यांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Shaina NC WhatsApp Hacked: शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; 3.92 लाखांची फसवणूक

नियमभंग करणाऱ्यांना कडक इशारा

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमभंग करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. “नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आवश्यक लेबलिंगशिवाय कोणतेही सौदर्यप्रसाधन उत्पादन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा उत्पादनांचा स्रोत, गुणवत्ता आणि सुरक्षितता पडताळणे कठीण होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणारे उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Jogeshwari fda raid unlabelled toilet soap worth rs 10 94 lakh seized in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • FDA
  • jogeshwari
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Parbhani News: सुधारित वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
1

Parbhani News: सुधारित वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!
2

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
3

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
4

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.