Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॅकर्सचा डार्क वेबवर दावा! भारताच्या सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाच्या गुपिते लीक; रिलायन्सने दिली सायबर हल्ल्याची कबुली

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कथित गोपनीय माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सायबर सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून संबंधित कंपनीने सायबर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 11:13 AM
हॅकर्सचा डार्क वेबवर दावा! भारताच्या सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाच्या गुपिते लीक; रिलायन्सने दिली सायबर हल्ल्याची कबुली

हॅकर्सचा डार्क वेबवर दावा! भारताच्या सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाच्या गुपिते लीक; रिलायन्सने दिली सायबर हल्ल्याची कबुली

Follow Us
Follow Us:
  • डार्क वेबवर अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कथित गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा.
  • संबंधित कंपनीने डेटावर सायबर हल्ला झाल्याची माहिती दिली.
  • सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली.
‘वर्ल्ड लीक्स’ नावाच्या रॅन्समवेअर ग्रुपने डार्क वेबवर भारताचा सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या कुडनकुलम प्रकल्प संबंधित गोपनीय फाईल्सचा मोठा साठा पोस्ट केला आहे. यामध्ये या अणू प्रकल्पाच्या काही भागांचे कथित ब्लूप्रिंट्स व पुरवठादारांच्या तपशिलांचा समावेश आहे. हॅकर्सनी हा डेटा ‘रिलायन्स ग्रुप’ कडून चोरल्याचा दावा केला आहे.

Cyber Fraud News: ‘३ कोटी द्या आणि मंत्री व्हा…’, काँग्रेस महिला आमदाराला थेट फोन; सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले!

तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील सातपैकी सर्वात मोठा प्रकल्प आहे. देशाच्या अणुऊर्जा क्षमतेचा विस्तार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पाच्या कंत्राटदारांपैकी एक असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने एका निवेदनात मान्य केले आहे की, त्यांच्या डेटावर अंशतः सायबर हल्ला झाला आहे. हा डेटा ‘योटा’ या थर्ड पार्टी भारतीय डेटा सेंटर सेवा प्रदात्याच्या सव्र्व्हरवर होस्ट केलेला होता. रिलायन्सने या घटनेची माहिती सरकारला दिल्याचे सांगितले, मात्र नेमका कोणत्या प्रकारचा डेटा लीक झाला आहे, याचा खुलासा केलेला नाही.

अण्वस्त्र सुरक्षेवर काम करणाऱ्या आणि सरकारांना सल्ला देणाऱ्या ‘न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्ह’चे वरिष्ठ संचालक निकोलस रोथ यांच्या मते, या डेटा लोकमुळे अणू प्रकल्पाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, ही घटना भारतात हकिंगच्या घटना किती प्रमाणात वाढल्या आहेत आणि अनेक कंपन्या अद्यापही अशा धोक्यांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाहीत, हे दर्शवते.

खंडणी मागितल्याची शक्यता

रिलायन्स ग्रुपची उपकंपनी असलेल्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ‘ला २०१८ मध्ये या अणू प्रकल्पाच्या युनिट ३ आणि युनिट ४ व्या पायाभूत सुविधा उभारण्याचे कंत्राट मिळाले होते. हे दोन्ही युनिट्स सध्या निर्माणाधीन असून २०२७पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, ज्यातून एकूण २,००० मेगावॅट विजेची निर्मिती होईल. ‘वर्ल्ड लीक्स’ हा एक कुख्यात रॅन्समवेअर ग्रुप असून यापूर्वी त्यांनी ‘नायकी’ आणि ‘टाटा ग्रुप’लाही लक्ष्य केले आहे. सामान्यतः कंपन्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यास हा ग्रुप त्यांचा डेटा आपल्या डार्क वेब साईटवर प्रसिद्ध करतो, जी केवळ ‘टॉर’ सारख्या विशेष ब्राउझरद्वारेच वापरता येते.

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

डेटा लीकची देशात महामारी

सुरक्षा संशोधकांच्या मते, या फाईल्स चुकीच्या हातात पडल्या, तर त्यांचा वापर प्रकल्पाच्या सपोर्ट सिस्टीमचा नकाशा तयार करण्यासाठी, पुरवठादारांची ओळख पटवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. सायबर सुरक्षा कंपनी ‘सर्फशार्क’च्या अहवालानुसार, डेटा लीकच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे गेल्या वर्षी २.८९ कोटी खात्यांवर डल्ला मारण्यात आला होता. या यादीत केवळ अमेरिका आणि फ्रान्स हे देश भारताच्या पुढे आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Kudankulam nuclear power plant data leak dark web reliance cyber attack claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Cyber Attack
  • NAVARASHTRA
  • Reliance

संबंधित बातम्या

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता
1

Chandrapur News: गणेशोत्सवासाठी चंद्रपूर सज्ज; बाजारपेठा सजल्या, जिल्ह्यात १७ हजार गणरायांच्या आगमनाची शक्यता

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
2

Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर
3

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

Raigad News: रायगड लोकसभेवर शिंदे गटाचा दावा? भरत गोगावलेंच्या ‘झाकली मूठ’ वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
4

Raigad News: रायगड लोकसभेवर शिंदे गटाचा दावा? भरत गोगावलेंच्या ‘झाकली मूठ’ वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.