Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: भायखळ्यात मलेरियाचा विळखा! आतापर्यंत मनपा दवाखान्यात १२ रुग्ण मलेरियाग्रस्त

भायखळा परिसरात मलेरियाच्या वाढत्या प्रकरणांमुळे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2026 | 06:40 PM
भायखळ्यात मलेरियाचा विळखा! आतापर्यंत मनपा दवाखान्यात १२ रुग्ण मलेरियाग्रस्त

भायखळ्यात मलेरियाचा विळखा! आतापर्यंत मनपा दवाखान्यात १२ रुग्ण मलेरियाग्रस्त

Follow Us
Close
Follow Us:

​मुंबई : भायखळा पश्चिम येथील ‘मंदार निकेतन’ इमारतीसह परिसरात मलेरियाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष आणि मंदार निकेतन रहिवासी मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांचे या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भायखळ्यात तातडीने स्वच्छ भारत अभियान राबवून मलेरियाचे निर्मूलन करावे, अशी मागणी केली आहे.

​नेमकी परिस्थिती काय?

​मंदार निकेतन इमारतीमध्ये अनेक नागरिक सध्या तापाने फणफणले आहेत. यावर तळेकर यांनी सांगितले की, एकट्या बाळासाहेब ठाकरे मनपा दवाखान्यात आतापर्यंत १२ रुग्ण मलेरियाग्रस्त आढळले आहेत. खासगी रुग्णालयातील आकडा धरल्यास ही संख्या कित्येक पटीने जास्त असू शकते. सुभाष तळेकर यांनाही शुक्रवारी ताप आल्याने त्यांनी रक्ताची चाचणी केली आहे.

DNA आधारित उपचारांची नवी पहाट! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अँटिबायोटिक उपचार पद्धतीत बदलाची चिन्हे

​प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे

​परिसरातील परिस्थिती अत्यंत भयावह असून ‘हाऊस गल्ल्या’ कचरा आणि सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. काही ठिकाणी तर सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून केवळ वरवरची कारवाई केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

रिपोर्ट काय अमेरिकेहून येतो का?

​सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, शुक्रवारी केलेल्या रक्त चाचणीचा रिपोर्ट मिळण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागत आहे. ‘शुक्रवारचा रिपोर्ट सोमवारी येणार? हा रिपोर्ट काय अमेरिकेहून येणार आहे का?’ असा बोचरा सवाल तळेकर यांनी उपस्थित केला आहे.

​’दिव्याखाली अंधार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना ‘स्वच्छ भारत अभियाना’चे दूत म्हणून नियुक्त केले आहे. डबेवाल्यांचा घटक म्हणून स्वतः सुभाष तळेकर यांनी अनेक संस्थांमध्ये या विषयावर व्याख्याने दिली आहेत. मात्र, त्यांच्याच इमारतीखाली सांडपाण्याची ही दुरवस्था असल्याने ‘दिव्याखाली अंधार’ अशी आपली स्थिती झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतील भायखळा परिसरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाआधीच डासांची वाढ आणि अस्वच्छतेच्या समस्या यामुळे परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डबेवाले दररोज शहरभर फिरत असल्याने त्यांच्यावर संसर्गाचा धोका अधिक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भायखळा परिसरात डासांची पैदास रोखण्यासाठी फॉगिंग, स्वच्छता मोहीम, पाणी साचू न देणे यासारख्या उपाययोजना त्वरित राबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती करून मलेरियावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका प्रशासनाने परिस्थितीची दखल घेत आवश्यक ती पावले उचलण्याचे संकेत दिले असून, लवकरच विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.

“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

Web Title: Byculla malaria outbreak dabbawala association subhash talekar approaches bmc commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • BMC
  • malaria
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !
1

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !

Mumbai Bandra Demolition: वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत
2

Mumbai Bandra Demolition: वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली
3

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!
4

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.