Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; सागर डॅशला अटक, मुंबई कनेक्शनची चौकशी सुरू

ED Arrest: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत सागर डॅश याला अटक केली आहे. या प्रकरणात 'म्युल अकाउंट' अर्थात बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कचा वापर झाल्याचा संशय आहे. या नेटवर्कचे मुंबईशी असलेले संबंध तपासण्यास ईडीने सुरुवात केली असून, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 02, 2026 | 01:15 PM
ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; सागर डॅशला अटक, मुंबई कनेक्शनची चौकशी सुरू

ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; सागर डॅशला अटक, मुंबई कनेक्शनची चौकशी सुरू

Follow Us
Follow Us:
  • ‘म्युल अकाउंट’ नेटवर्कमुळे ईडीच्या रडारवर मुंबई!
  • ऑनलाइन बेटिंग प्रकरणात सागर डॅशला अटक
  • बेनामी बँक खात्यांच्या जाळ्याचा पर्दाफाश होणार?
नीता परब, मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-II ने सागर डॅश याला अटक केली आहे. तो ‘ऑल पॅनेल एक्सचेंज’ (ए पीएक्स) द्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन सट्टेबाजी आणि सायबर-फसवणूक नेटवर्कशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याच्यावर सहकारी बँका, बनावट कंपन्या (शेल एंटिटीज) आणि क्रिप्टोकरन्सी चॅनेलद्वारे शेकडो कोटी रुपयांची गुन्हेगारी मालमत्ता वळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (ED Arrest)

डॅशला २७ ऑक्टोबर रोजी ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’ , २००२ अंतर्गत अटक करण्यात आली आणि मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि इतर शहरांशी संबंधित या सट्टेबाजी नेटवर्कच्या आर्थिक व्यवहारांची नव्याने चौकशी सुरू झाली असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

Mumbai News: फटाक्यांचा आवाज मर्यादेत; विषारी रसायनांचा धोका! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर

नेटवर्कची सखोल आर्थिक चौकशी …

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी आठ केंद्रीय प्राधिकरणांकडे एक स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. यामध्ये समुद्र सिंग राठोड, मुकेश जैन, रामधानी आणि डॅश यांचा समावेश असलेल्या या कथित नेटवर्कची सखोल आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. असा आरोप आहे की, ऑपरेटर्सनी ऑनलाइन बेटिंग, मटका, कॅसिनो गेमिंग आणि सायबर-फसवणुकीच्या प्लॅटफॉर्मसाठी बनावट बँक खाती आणि यूपीआय आयडी उपलब्ध करून दिले, ज्यामुळे औपचारिक वित्तीय प्रणालीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निधीची देवाणघेवाण शक्य झाली, असल्याचे म्हणणे आहे.

ईडीच्या तपासानुसार, ऑनलाइन सट्टेबाजी आणि सायबर-फसवणुकीशी संबंधित तीन एफआयआर आहेत. शिवाय पीडितांकडून गोळा केलेली रक्कम हैदराबादमधील ‘ज्युबिली हिल्स मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक’मध्ये असलेल्या अनेक ‘म्युल’ (बेनामी) बँक खात्यांमधून वळवण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम विविध बनावट कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आली आणि त्यातील मोठी रक्कम बेंगळुरूमधील ‘नगरभावी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या नोडल खात्यात जमा करण्यात आली असल्याचे अधिकारी सांगतात. हे खाते ‘आर्मस्ट्राँग एक्सचेंज प्रायव्हेट लिमिटेड’साठी वापरले जात होते, जी डॅशने स्थापन केलेली कंपनी आहे.

बनावट कागदपत्रांचा वापर

तपास अधिकारी यांच्या मते, डॅशने कथितरीत्या या सहकारी संस्थेच्या केवायसी तपशीलांचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून क्रिप्टोकरन्सी खाती उघडली होती. या सहकारी संस्थेच्या बँक खात्याद्वारे शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार झाले, ज्यातील मोठी रक्कम बेकायदेशीर गेमिंग, सट्टेबाजी प्लॅटफॉर्म आणि सायबर-फसवणुकीतून मिळवलेल्या कमाईशी थेट संबंधित असल्याचे दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुंबईशी संबंधित दुवा अत्यंत महत्त्वाचा असून ईडीचे मुंबई विभागीय कार्यालय या प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासांतर्गत मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सुरत आणि मेहसाणा (गुजरात) येथे छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, विविध बँक खात्यांमधील सुमारे ९ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. याआधी, याच तपासाच्या संदर्भात ईडीने ‘एडसम फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड’चा मुख्य कार्यकारी अधिकारी राम यू. रामधानी याला अटक केली होती.

या तक्रारीत असाही आरोप आहे की, या नेटवर्कचे परदेशी ऑपरेटर्ससोबत आर्थिक संबंध होते आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी हवाला व क्रिप्टोकरन्सी माध्यमांचा वापर केला गेला. हे आरोप तपास अधिकाऱ्यांकडून अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध व्हायचे असल्याचे समजते.

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी ईडीने कोणाला अटक केली आहे?

    Ans: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सागर डॅश याला अटक केली आहे.

  • Que: म्युल अकाउंट म्हणजे काय?

    Ans: म्युल अकाउंट म्हणजे इतर व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाणारे बँक खाते. अशा खात्यांचा वापर संशयास्पद किंवा बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.

  • Que: या प्रकरणात ईडीकडून कोणत्या बाबींची चौकशी सुरू आहे?

    Ans: ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार, म्युल अकाउंट नेटवर्क आणि या नेटवर्कचे मुंबईशी असलेले संभाव्य संबंध यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: Ed arrests sagar dash online betting scam mule bank account network mumbai links sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • ED
  • MONEY
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास
1

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास

Mumbai Air Pollution : दिल्ली मागे पडली, मुंबईत श्वास घेणंही कठीण! प्रदूषणाची पातळी वाढल्याने वाहतूक पोलिसांचे आरोग्य धोक्यात
2

Mumbai Air Pollution : दिल्ली मागे पडली, मुंबईत श्वास घेणंही कठीण! प्रदूषणाची पातळी वाढल्याने वाहतूक पोलिसांचे आरोग्य धोक्यात

Prabhu Yeshu Janmotsav 2026: गिरगाव चौपाटीवरील ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रम वादात; आयोजकांना कायदेशीर नोटीस
3

Prabhu Yeshu Janmotsav 2026: गिरगाव चौपाटीवरील ‘प्रभू येशू जन्मोत्सव २०२६’ कार्यक्रम वादात; आयोजकांना कायदेशीर नोटीस

Cityscape India चे भारतात पदार्पण; मुंबईत रंगणार रिअल इस्टेटचा ग्लोबल इव्हेंट, ४० हून अधिक डेव्हलपर्स येणार एकत्र
4

Cityscape India चे भारतात पदार्पण; मुंबईत रंगणार रिअल इस्टेटचा ग्लोबल इव्हेंट, ४० हून अधिक डेव्हलपर्स येणार एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.