Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्लास्टिकला नकार, हरित भविष्यास होकार’; मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी २२ दिवसांचे विशेष जागृती अभियान राबवले. प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण, स्वच्छता आणि शाश्वत विकास यावर भर देत विविध उपक्रमांद्वारे प्रवासी व नागरिकांमध्ये जनजा

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 10:44 AM
'प्लास्टिकला नकार, हरित भविष्यास होकार'; मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम

'प्लास्टिकला नकार, हरित भविष्यास होकार'; मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम

Follow Us
Follow Us:
  • १५ मे ते ५ जूनदरम्यान मध्य रेल्वेच्या सर्व मंडळांमध्ये पर्यावरण जागृती मोहीम राबवण्यात आली.
  • वृक्षारोपण, प्लास्टिक बंदी, पथनाट्य आणि स्वच्छता उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.
  • प्रवाशांना प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेने शुक्रवारी (५ जून) विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी प्रधान विभागाध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरणपूरक सवयींचे महत्त्व इतरांनाही पटवून देण्याची शपथ दिली. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाचही मंडळांमध्ये तसेच प्रमुख कारखान्यांमध्ये १५ मे ते ५ जून या कालावधीत व्यापक पर्यावरण जागृती अभियान राबवण्यात आले.

Mumbai News: रस्त्यांसाठी पालिकेचा मेगा प्लान! सातही परिमंडळांत जेटिंग वॉटर टँकर भाड्याने घेणार; १५० दिवसांचे कंत्राट

रे रोड स्थानकाचा वृक्षारोपणात मोठा सहभाग

मुंबई मंडळाने विक्रेत्यांवर नजर ठेवून प्लास्टिक बंदी राबवली. भुसावळ, नागपूर, पंढरपूर-शेगाव, कलबुर्गी येथे स्काऊट गाईड आणि सांस्कृतिक पथकांनी वातावरण बदलाव पथनाट्य सादर केली. माटुंग्यात कर्मचाऱ्यांसाठी ‘पार्शल पाउच कटिंग’ तंत्रज्ञानाव चर्चासत्र घेऊन मायक्रोप्लास्टिक पर्यावरणात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी वृक्षारोपणही झाले. ज्यात रे रोड स्थानकाचा मोठा सहभाग होता.

मध्य रेल्वेचे प्रवाशांना करण्यात आले आवाहन

मध्य रेल्वेने आपल्या दैनंदिन कामात शाश्वतता आणि हरित पायाभूत सुविधा आणण्याचा संकल्प केला असून, प्रवाशांनाही स्टेशन परिसर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन कैले आहे. प्रवासी पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली, पर्यावरणपूरक पिशवी वापरून आणि स्थानकांवरील वेगळ्या डस्टबिनचा योग्य वापर करून योगदान देऊ शकता, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले.

बाणगंगा येथे हिंदू सम्मेलन व भव्य कलश यात्रा संपन्न, उपक्रमातून हिंदू संघटन, सांस्कृतिक जागृती आणि सामाजिक एकतेचा संदेश

स्टीकर, बॅनर आणि कार्यशाळांद्वारे जनजागृती

हजारो अधिकारी, कर्मचारी, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना शाश्वत विकास, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि एकल वापर प्लास्टिकच्या निर्मूलनासाठी प्रेरित करण्यात आले. माटुंगा कारखान्याने ऊर्जा बचत आणि जलसुरक्षेचा संदेश देणाऱ्या सुमारे ५० सहभागींच्या मोठ्या रॅलीचे आयोजन केले. वृक्षारोपण आणि पर्यावरण वॉर्केथॉनही घेण्यात आले, प्रवासी सहभागासाठी ‘स्वच्छ प्लॅटफॉर्म, हरित भविष्य’ अंतर्गत प्रमुख स्थानकांवर ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी रंगीत डस्टबिन बसवले, प्लास्टिक बाटल्या क्रश करणारी यंत्रेही बसवून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘पाण्याची बाटली सोबत ठेवा’ आणि ‘प्लास्टिकला नकार द्या’ या संदेशांचे स्टिकर, बॅनर आणि कार्यशाळांद्वारे जनजागृती झाली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Central railway launches 22 day environment awareness drive on world environment day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • central railway
  • Mumbai News

संबंधित बातम्या

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
1

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
2

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
3

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
4

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.