Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुंबईतील प्रदूषण रोखणाऱ्या नियमांचे उल्लंघन केल्यास २० लाखांचा दंड’; ‘MMRDA’ च्या बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे ही आपल्या सर्वांसाठीच प्राधान्याची बाब आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 28, 2024 | 08:07 PM
'मुंबईतील प्रदूषण रोखणाऱ्या नियमांचे उल्लंघन २० लाखांचा दंड'; 'MMRDA' च्या बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

'मुंबईतील प्रदूषण रोखणाऱ्या नियमांचे उल्लंघन २० लाखांचा दंड'; 'MMRDA' च्या बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत शहरी विकास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

धूळ नियंत्रित करण्यासाठी तातडीने करायच्या उपाययोजना, बांधकामांच्या कामावर देखरेख, मलब्याचे व्यवस्थापन आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळांवरील वाहन वाहतुकीचे नियमन यांचा नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राधिकरणाची विकासासाठी प्रयत्न करण्यासोबतच पर्यावरणासंदर्भातील समस्यांवर उपाययोजना शोधण्याची प्रतिबद्धता अधोरेखित होते.

प्रमुख उपाययोजना खालीलप्रमाणे :

१. धुळीवर नियंत्रण मिळवणे :
o बांधकाम सुरू असलेल्या सर्व ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर्स आणि फॉगिंग मशीन्स तैनात करणे
o मातीची वाहतूक करताना आणि बांधकाम साहित्याच्या साठ्यावर पाण्याची नियमित फवारणी करणे.
o प्रकल्प परिसरात यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या सफाई यंत्रांचा वापर करणे

२. लक्ष ठेवणे आणि व्यवस्थापन

o विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी.
o प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी सर्वसमावेशक निरीक्षण आणि अहवाल यंत्रणा.

३. मलवा व्यवस्थापन :

o अनधिकृतपणे मलवा टाकण्यास प्रतिबंध आणि धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व पाडकाम (सीअँडडी) कचऱ्याच्या वाहतुकीचे योग्य नियोजन.

४. वाहनांचे नियमन :

o बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी योग्य झाकण आणि परवान्यांसह मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन.

५. कचरा जाळण्याला प्रतिबंध

o प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा जाळण्याला पूर्ण प्रतिबंध

मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी एमएमआरडीएने कंत्राटदारांसाठी कडक दंड निश्चित केला आहे. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ५ लाख रुपयांपासून दंड सुरू होईल, तर पुन्हा उल्लंघन झाल्यास हा दंड २० लाखांपर्यंत वाढवला जाईल आणि कामकाज थांबवण्याची कारवाई केली जाईल.

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेशाचा विकास हा पर्यावरणीय प्राधान्यांशी सुसंगत असला पाहिजे. या उपाययोजनांमधून भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि आरोग्यदायी शहरी परिसंस्था निर्माण करण्यासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित होते.”

उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे ही आपल्या सर्वांसाठीच प्राधान्याची बाब आहे. बांधकामामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेल्या काटेकोर उपाययोजना या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विकास प्रकल्प राबविताना आम्ही पर्यावरण संरक्षणालाही तितकेच महत्त्व देतो. स्वच्छ आणि अधिक शाश्वत एमएमआर निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आयएएस डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, स्वच्छ हवा मिळेल यासाठी प्रयत्नशील असणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे एमएमआरडीएने वेगवान पायाभूत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व भागधारकांनी या तत्त्वांचे पालन करून स्वच्छ मुंबईसाठी योगदान द्यावे, असे आम्ही आवाहन करतो.”

या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरू होत असून एमएमआरडीएच्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर असून, त्यांनी या संदर्भातील नोंदी ठेवून प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश हा शाश्वत शहरी विकासासाठीचा जागतिक स्तरावरील एक आदर्श ठरावा या आपल्या ध्येयासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे.

Web Title: Cm devendra fadnavis and dcm eknath shinde meeting mmrda about control mumbai air pollution guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 07:33 PM

Topics:  

  • Air Pollution
  • CM Devendra Fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.