Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“५० खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत…”; मल्लिकार्जून खर्गेंची महायुतीवर टीका

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक है तो सेफ है, हा नारा असलेली एक तिजोरी दाखवली, ही तिजोरीतून एक फोटो काढला, त्यावर उद्योगपती गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींची छायाचित्रे होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2024 | 02:35 AM
"५० खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत..."; मल्लिकार्जून खर्गेंची महायुतीवर टीका

"५० खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत..."; मल्लिकार्जून खर्गेंची महायुतीवर टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.

काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे प्रचार सभा झाली. बटेंगें तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या भाजपाच्या घोषणांचा समाचार घेत खर्गे म्हणाले की महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर सुरु आहे पण काही लोकांना जाती धर्मांमध्ये भांडणे लावायची आहेत.

काँग्रेस मविआचा मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे पालन करून सर्वांना मजबूत करणे हा हेतू आहे. भारतीय जनता पक्ष जाती धर्मात फूट पाडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिले आहे हे विसरू नका. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी कन्याकुमारी के काश्मीर पदयात्रा काढली. देशाची लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही लडाई असून हे काम सर्वांना करायचे आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi PC: मोदींच्या सपोर्टशिवाय अदानी हे करूच शकत नाहीत..; राहुल गांधींनी थेट मुद्द्यालाच हात घातला

भाजपा युती सरकारच्या राजवटीत शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचे जगणे कठीण केले आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतमालाला भाव नाही. भाजपा युती सरकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटले आहे. काँग्रेसच्या ५ गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल असे सांगून २० तारखेला जनताच भ्रष्टभाजपा युतीला सत्तेतून खाली खेचेल असा विश्वास मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक है तो सेफ है, हा नारा असलेली एक तिजोरी दाखवली, ही तिजोरीतून एक फोटो काढला, त्यावर उद्योगपती गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींची छायाचित्रे होती. त्यावरही एक है तो सेफ है असा नारा लिहीला होती. दुसऱ्या पोस्टरवर मुंबईतील धारावीचा नकाशा होता. धारावी हा एक लाख कोटींचा धंदा सुरू आहे, असा आरोप केला. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी एकत्र आहेत तरच सुरक्षित आहेत असं म्हणत त्यांनी मोदींच्या एक है तो सेफ हैचा अर्थ सांगितला. मोदी आणि गौतम अदानींचा नारा आहे. एक कोण आहेत तर अदानीजी आणि मोदीजी आहेत. अमित शाहाजी आहेत. सेफ आहेत तर कोण सेफ आहेत. अदानीजी आहेत, कष्ट कोणाला होणार, नुकसान कुणाचे होणार तर धारावीच्या जनतेचे होणार, हिंदुस्तानातील लघु आणि सुक्ष्म उद्योगांचं एक महत्त्वाचं ठिकाण हे धारावी आहे. एकाच व्यक्तीसाठी हे मुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नारा त्यांनी दिला आम्ही समजावून सांगितला.

Web Title: Congress president mallikarjun kharage criticizes to mahayuti and shivsena maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.