Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; ‘हा तर डॉ. कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न’, लोढा यांची टीका

मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नामांतराच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी संस्थेचे नाव बदलण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 06, 2026 | 09:09 AM
मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; 'हा तर कलाम यांचा नाव पुसण्याचा प्रस्ताव', लोढा यांची टीका

मांडवी आयटीआय नामांतराचा वाद चिघळणार; 'हा तर कलाम यांचा नाव पुसण्याचा प्रस्ताव', लोढा यांची टीका

Follow Us
Follow Us:
  • मांडवी येथील शासकीय ITI ला 2024 मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले होते.
  • आमदार अमीन पटेल यांनी संस्थेचे नाव बदलून हाजी अब्दुल रहमान शाह बाबा करण्याची मागणी केली होती.
  • मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत कलाम यांचे नाव बदलण्याचा प्रयत्न निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्थाच्या नामांतराचा मुद्दा आता चिघळण्याची शक्यता आहे. सरकारकडून या आयटीआयला दोन वर्षांपूर्वी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले असून या नावाला स्थानिक आमदार अमीन पटेल यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. पटेल यांनी या आयटीआयला हाजी अब्दुल रहमान शाह बाबा असे करावा, असा प्रस्ताव कौशल्य विकास विभागाकडे दिला असून हा प्रकार कलाम याचा नाव पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी एक्सवरुन केली.

चर्चगेटवर देशातील पहिले मोफत स्टेशन पुस्तकालय! प्रवासातच वाचनाची संधी; एबी डीव्हिलियर्स यांच्या हस्ते ‘लायब्ररी जंक्शन’चे उद्घाटन

मंगलप्रभात लोढा यांचा आमदार अमीन पटेल यांच्या प्रस्तावाला विरोध

मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय २०२४ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार मांडवी येथील शासकीय आयटीआयला भारतरत्न, माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा हा एक गौरव होता जेणेकरून पुढील पिढीला त्यांच्या योगदानाची ओळख होईल व प्रेरणा मिळेल. या गोष्टीचा अत्यंत खेद वाटतो की आमदार अमीन पटेल यांनी इतक्या महान व्यक्तीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या विभागासमोर मांडला, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक्सवरुन शुक्रवारी दिली. तर त्याचवेळी लोढा यांनी या प्रस्तावाला आता विरोध करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. (फोटो सौजन्य – Iti Mandavi) 

आमदार अमीन पटेल यांनी केली ही मागणी

स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी या आयटीआयला नाव बदलून हाजी अब्दुल रहमान शाह बाबा ठेवण्यात यावे अशी मागणी केली गेली. भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक अब्दुल कलाम साहेब यांचे योगदान वंदनीय आहे आणि त्यांचे नाव पुसण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. आम्ही हा प्रस्ताव ठामपणे फेटाळत आहोत, अशी माहिती यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे आता या प्रस्तावावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आरे परिसरात समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार; आशिष शेलार

पत्रात काय म्हटलं?

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रात म्हटलं आहे की, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतरणाचा निर्णय दिनांक ०४.१०.२०२४ रोजी शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक संस्थांना थोर, वंदनिय व महान व्यक्तींचे नावे देण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई मांडवी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. परंतू आपण दिनांक ११.०२.२०२६ च्या पत्रान्वये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव बदलून हाजी अब्दुल रेहमान शाह बाबा हे नाव देण्याबाबत शासनास विनंती केली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती असलेले व सदैव वंदनिय असलेले महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव हा निंदनीय आहे. यास्तव आपण केलेली मागणी फेटाळण्यात येत आहे.

Web Title: Controversy over renaming mandvi iti amin patel demands replacing apj abdul kalams name with haji abdul rahman shah baba

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती
1

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन
2

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
3

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
4

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.