चर्चगेटवर देशातील पहिले मोफत स्टेशन पुस्तकालय! प्रवासातच वाचनाची संधी; एबी डीव्हिलियर्स यांच्या हस्ते 'लायब्ररी जंक्शन'चे उद्घाटन
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी चर्चगेट स्थानकावर देशातील पहिले मोफत सार्वजनिक ‘स्टेशन पुस्तकालय’ सुरू करण्यात आले. ‘लायब्ररी जंक्शन’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एबी डी व्हिलियर्स यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी करण्यात आले. ही संकल्पना प्रोजेक्ट मुंबईने पश्चिम रेल्वेच्याच्या सहकार्याने राबवली आहे.(फोटो सौजन्य – AI)
ग्रंथालय सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार असून वाचकांच्या मदतीसाठी ग्रंथपालही उपलब्ध असतील. या उपक्रमासाठी मुंबईतील नागरिक, विविध संस्था आणि शाळांनी मोठ्या प्रमाणात पुस्तकदान केले आहे. पुस्तकांचे वर्गीकरण आणि सूचीकरण करण्यासाठी स्वयंसेवकांनीही योगदान दिले आहे.दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांच्या हस्ते, प्रबंधक पंकज सिंह आणि प्रोजेक्ट मुंबईचे सीईओ व संस्थापक शिशिर जोशी यांच्या उपस्थितीत चर्चगेट स्थानकाच्या दक्षिण कॉनकोर्स परिसरात उद्घाटन झाले. ‘लायब्ररी जंक्शन’ हा प्रोजेक्ट मुंबईच्या ‘रीड मुंबई’ उपक्रमाचा भाग असून उपलब्ध करून देणे आणि वाचन सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे पुस्तके संस्कृतीला चालना देणे हा त्यामागील उद्देश आहे. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या चर्चगेट येथे दैनंदिन प्रवासादरम्यान पुस्तकांच्या सहवासाचा आनंद घेता येणार आहे
या ग्रंथालयाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याची उभारणी प्रोजेक्ट मुंबईच्या ‘प्लास्टिक रिसायक्लाथॉन’ मोहिमेदरम्यान संकलित करण्यात आलेल्या पुनर्वापरित प्लास्टिकपासून करण्यात आली आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.सध्या ग्रंथालयात सुमारे १,२००८ पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे. यामध्ये कॉमिक्स, बालकथा, कादंबऱ्या स्वयंविकास विषयक पुस्तके आत्मचरित्रे, योगविषयक साहित्य तसेच् विविध नियतकालिकांचा समावेश आहे.प्रवाशांना पुस्तके घरी नेण्याची आणि ती दोन आठवड्यांच्या आत परत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देशातील पहिले मोफत सार्वजनिक रेल्वे स्थानक ग्रंथालय.
चर्चगेट स्थानकाच्या दक्षिण कॉन्कोर्समध्ये उभारणी.
सुमारे १,२०० पुस्तकांचा संग्रह.पुस्तके दोन आठवड्यांसाठी घरी नेण्याची सुविधा
पुनर्वापरित प्लास्टिकपासून ग्रंथालयाच निर्मिती.
सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सेवा उपलब्ध.
नागरिकांकडून पुस्तकदानाचे स्वागत.






