Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिप्ला’वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

तुम्ही कौतुकास्पद काम करत आहात, परंतु आता तुम्ही अति करत आहात. तुमच्याकडून चूक झाली आहे आणि ती सुधारावीच लागेल, असे कोर्टाने म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2026 | 08:46 AM
'सिप्ला'वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

'सिप्ला'वरील बंदी उठवली, MCA चे कॅन्टीन पुन्हा सुरू; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर कोर्ट संतप्त

Follow Us
Follow Us:

मुंबई : सिप्ला लिमिटेडच्या पुणे येथील ‘कॅरी अँड फॉरवर्डिंग’ युनिटचा औषध विक्री परवाना रद्द केल्याप्रकरणी महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मुंबई हायकोर्टाच्या ताशेऱ्यांचा आणि इशाऱ्याचा सामना करावा कारवाई नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत मुंढे यांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.

हायकोर्टाच्या आक्षेपानंतर एफडीएने सिप्लाचा परवाना रद्द करण्याचा आदेश मागे घेण्याचा आणि कंपनीला नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. मुंबई हायकोर्टात शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने एफडीएच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, तुम्ही कौतुकास्पद काम करत आहात, परंतु आता तुम्ही अति करत आहात. तुमच्याकडून चूक झाली आहे आणि ती सुधारावीच लागेल. सार्वजनिक सुटीच्या दिवशी कंपनीला सुनावणीसाठी बोलावून त्याच दिवशी आदेश पारित करण्याच्या निष्पक्षतेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सुनावणी न घेताच FDA ने परवाना केला रद्द

सिप्लातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी सांगितले की, २६ ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु कंपनीचे प्रतिनिधी उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. तरीही एफडीएने सुनावणी न घेताच परवाना रद्द केला. एफडीएच्या वतीने अॅड. पी. पी. काकडे यांनी बाजू मांडली, परंतु न्यायालयाने ही कारवाई नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या विरोधात मानली. हायकोर्टाच्या कडक भूमिकेनंतर एफडीएने आदेश मागे घेत असल्याचे सांगितले.

नव्याने जारी होणार नोटीस

विभाग आता सिप्लाला नव्याने कारणे दाखवा नोटीस बजावेल आणि कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार सविस्तर आदेश पारित केला जाईल. सिप्लाने न्यायालयात स्पष्ट केले की, एफडीएच्या परवाना रद्द करण्याच्या आदेशात कंपनीच्या उत्पादनांची सुरक्षा, गुणवत्ता किंवा गुणकारकतेबाबत कोणतीही चिंता व्यक्त करण्यात आलेली नव्हती.

FDA ने केली होती कारवाई

काही दिवसांपूर्वी, रिएक्टिन प्लस’ या गोळ्यांच्या पॅकेजिंगमधील अनियमितता आणि शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने  (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या वडकी येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लि.’ च्या सी अँड एफ डेपोचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने (Tukaram Mundhe) रद्द करण्यात आला आहे. जून २०२६ मध्ये केलेल्या तपासणीदरम्यान या डेपोतून ११.१९ लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला होता.

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा

Web Title: Court expresses strong displeasure over tukaram mundhes action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Court Decision
  • Maharashtra Government
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार
1

Nepal Flood : नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुटका; नागपूरचे 106 भाविक मायभूमीकडे रवाना, 37 जण मुंबईत परतणार

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा
2

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा

Wardha News : एफडीएचा दणका; मुदतबाह्य बेसनच्या रि-पॅकिंगप्रकरणी ब्लिंक इट आणि कांचन फूड्सचा परवाना निलंबित
3

Wardha News : एफडीएचा दणका; मुदतबाह्य बेसनच्या रि-पॅकिंगप्रकरणी ब्लिंक इट आणि कांचन फूड्सचा परवाना निलंबित

Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…
4

Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.