Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Accident : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Dadar Bus Accident : मुंबईतील दादर येथील प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने ट्रेलरसह तीन ते चार वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 11:43 AM
स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Follow Us
Follow Us:
  • दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात
  • २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
  • प्लाझा परिसरात वाहतूक कोंडी
  • स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात
Mumbai Dadar Bus Accident : मुंबईतील दादर परिसरात प्लाझा टॉकीजजवळ सोमवारी (8 जून 2026) सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दादर पश्चिममधील कोतवाल गार्डन चौकात झाला. बेस्ट बस आणि कार यांच्यातील ही धडक सकाळी ९:१५ ते ९:४५ च्या दरम्यान झाली. दादरमधील कोतवाल उद्यान आणि प्लाझा टॉकीज परिसरात आल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बसने सुरुवातीला एका ट्रेलरला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बसने आणखी तीन ते चार वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. एका दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही वाहनांचंही नुकसान झालं आहे. या अपघातात बेस्ट बसमधील चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती आणि मृतांचा तपशील अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेला नाही.

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

बेस्ट बस क्रमांक ४६३ प्लाझा सिनेमाजवळून जात असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे एक गंभीर अपघात झाला. बसने अनेक दुचाकींनाही धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, एक मोटारसायकलदेखील बसखाली ओढली गेली. यापूर्वीही वर्दळीच्या रस्त्यांवर असेच अपघात घडले असून, त्यात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या अपघातामुळे चालकाच्या मानसिक स्थिती आणि प्रशिक्षणाबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो दादरमधील अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो. प्लाझा टॉकीज परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी असते. भाजी विक्रेते, व्यापारी, नोकरदार वर्ग आणि प्रवाशांची सतत वर्दळ असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो. त्यामुळे अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलिस आणि वाहतूक विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघाताचं नेमकं कारण काय, बसचा वेग किती होता आणि चालकाची काही चूक होती का, याचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Mira Bhayandar: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Web Title: Dadar plaza talkies best bus accident two dead many injured traffic jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Accident
  • best bus
  • dadar

संबंधित बातम्या

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत
1

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

धावत्या Tata Sumo वर कोसळली भीषण दरड! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; खळबळजनक Video आला समोर
2

धावत्या Tata Sumo वर कोसळली भीषण दरड! १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; खळबळजनक Video आला समोर

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन
3

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.