Mira Bhayander: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
विठ्ठलनामाचा गजर थेट लंडनहून! पंढरीची वारी झाली ग्लोबल; लंडन ते पंढरपूर ५० दिवसांत ११ देशांचा प्रवास
गोल्डन चौकी परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अनधिकृत मशिद आणि मंदिराशी संबंधित बांधकामे हटविण्यात आली. कारवाईदरम्यान गोल्डन चौकी परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. पहाटेपासूनच मनपाच्या पथकाने जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्याचे काम सुरू केले. प्रशासनाने ही कारवाई कोणत्याही धर्माविरोधात नसून अनधिकृत बांधकामांविरोधातील नियमित प्रशासकीय कारवाई असल्याचे स्पष्ट केले.
मीरा-भाईंदर शहरात विविध कारणांमुळे अनेकदा धार्मिक आणि सामाजिक वाद समोर येत असतात. मात्र या कारवाईदरम्यान एक सकारात्मक बाब समोर आली. संबंधित मशिदीचे मौलाना स्वतः पुढे येत प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करताना दिसले. त्यांनी प्रशासनाच्या कारवाईला सहकार्य करत केले. ही कारवाई अनधिकृत बांधकामांवर होत असल्याने मौलाना यांनी प्रशासनाला पाठिंबा दर्शविला आणि नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि समाजमाध्यम वापरकर्त्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आहे की, या कारवाईशी संबंधित कोणतेही तणाव वाढवणारे, दिशाभूल करणारे अथवा समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ, फोटो किंवा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी पोलिसांनी दिला आहे.
ईस्राइल मध्ये स्थापन होणार छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा! महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!
प्रशासनाने स्पष्ट केले की, ही कारवाई कोणत्याही धर्माशी संबंधित नसून पूर्णपणे अनधिकृत बांधकामांवर करण्यात आलेली नियमित प्रशासकीय कारवाई आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषयाकडे कायद्याच्या चौकटीतून पाहावे आणि शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावे. या कारवाईनंतर परिसरात शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






