राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही
02 Oct 2025 08:39 PM (IST)
"तुम्ही तुमचा मेळावा पाकिस्तानात करायला पाहिजे", असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका केली.
02 Oct 2025 08:29 PM (IST)
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्कोत दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान करत म्हटले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही
02 Oct 2025 08:02 PM (IST)
"उद्धव ठाकरेंनी सरकारला आंदोलनाचा इशारा देत म्हटले, 'सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करून त्यांची कर्जमुक्ती करावी; अन्यथा आम्ही मराठवाड्यात रस्त्यावर उतरू.'"
02 Oct 2025 07:38 PM (IST)
"दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी संजय शिरसाट आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत म्हणाले, 'मंत्री पैश्यांची बॅग घेऊन बसलेत, पण त्यांना हात लावणार नाही.'"
02 Oct 2025 07:18 PM (IST)
ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात संजय राऊत यांनी महायुती सरकारला फैलावर घेतले आहे. "मुंबईतील रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतील रावणाला जाळायचा", असे म्हणत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
02 Oct 2025 07:03 PM (IST)
दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे राजन तेली शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा प्रवेश शिंदेंच्या दसरा मेळाव्यात होणार आहे.
02 Oct 2025 07:00 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यापूर्वी रेंज रोवर गाडी घेतली होती परंतु त्या गाडीचा वापर केला नव्हता. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी रेंज रोवर गाडीतून बसून फेरफटका मारला
02 Oct 2025 06:59 PM (IST)
अखेर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यात ठाकरेंची तोफ कोणावर डागली जाणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
02 Oct 2025 06:46 PM (IST)
शिवाजी पार्कात झालेल्या पावसामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. हे सर्व असून सुद्धा ठाकरेंच्या शिवसैनिकांचा उत्साह मात्र कायम दिसतोय. यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आगामी युतीबाबत कोणती घोषणा करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
02 Oct 2025 06:24 PM (IST)
कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याला सुरुवात झाली असून वीसहून अधिक बुलेट स्वार रॅलीमध्ये सहभागी आहेत. तसेच चार चाकी वाहनांचा ताफा आणि त्यामध्ये शाहू महाराज यांची 1930 सालची ऐतिहासिक मेबॅक कार आहे. या कारमध्ये स्वतः शाहू महाराज छत्रपती, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे आणि त्यांचे इतर कुटुंबिय हजर असेल.
02 Oct 2025 06:21 PM (IST)
शिवसेना आपल्या दारी, घेऊन आली योजनांची शिदोरी हे या योजनेचं ब्रीदवाक्य…
02 Oct 2025 06:18 PM (IST)
ठाकरेंच्या शिवसैनिकांचा ताफा समृद्धी महामार्गावर, नाशिकचे शिवसैनिक थोड्याच वेळात मुंबईत होणार दाखल, दसरा मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने, आज होणाऱ्या मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र येण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा, नाशिकहून अनेक शिवसैनिक रेल्वेने तर काही खासगी वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना
02 Oct 2025 06:13 PM (IST)
ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे. यासाठी शिवसेना कार्यकर्ते येण्यास सुरवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातून अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.
02 Oct 2025 06:13 PM (IST)
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये कार्यकर्ते दाखल झाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्तेही दाखले झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना “खरे बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंकडेच आहेत असा विश्वास व्यक्त केला. तसेच “राज आणि उद्धव एकत्र आले तरी फरक नाही, स्थानिक निवडणुकीत महापौर आमचाच होणार असंही या शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
Thackeray vs eknath Shinde Dasara Melava 2025: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज (२ ऑक्टोबर) दसरा मेळावा आयोजित करून ५८ वर्षांची परंपरा कायम ठेवणार आहे. शिवतीर्थावर सायंकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात पारंपारिक शस्त्रपूजन आणि सुवर्ण वितरण समारंभाचा समावेश असेल. मेळाव्याची सुरुवात काही नेत्यांच्या भाषणांनी होईल, त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. तर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये कार्यकर्ते दाखल झाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्तेही दाखले झाले आहेत.