Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (DRP) ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ पात्रतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी धारावीतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. १४ ते २६ मे पर्यंत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन...

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 07:08 PM
डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

Follow Us
Follow Us:
  • डीआरपीच्या मदतीसाठी धारावीतील नगरसेवक उतरले मैदानात
  • ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ पात्रतेचा तिढा सोडविण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार
  • १४ ते २६ मे पर्यंत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन
मुंबई : धारावीतील जास्तीत जास्त रहिवाशांना पुनर्विकासाचा लाभ मिळावा, यासाठी इथल्या स्थानिक नगरसेवकांनी धारावी पुनर्विकास प्राधिकरणासोबत (डीआरपी) खांद्याला खांदा लावून काम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी डीआरपी आणि स्थानिक नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नांतून १४ मे ते २६ मे पर्यंत, धारावीत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘एक खिडकी पडताळणी’ (सिंगल विंडो व्हेरिफिकेशन)

पद्धतीने राबविल्या जाणाऱ्या या शिबिरांमध्ये धारावीतील एकूण ६ सेक्टरमधील ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ प्रकरणांमधील कागदपत्रांची छाननी, पडताळणी आणि पुनर्सादरीकरण (री-सबमिशन) याविषयी रहिवाशांच्या शंकांचे निरसन करून त्यांना प्रकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना सामील करून घेण्यासाठी धारावीतील सर्वपक्षीय नगरसेवक मैदानात उतरणार आहेत.

याविषयासंदर्भात सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर, डीआरपीचे सचिव विपीन पालीवाल यांनी नगरसेवकांच्या या भूमिकेचे स्वागत केले. तसेच, आपापल्या प्रभागातील ‘अनिर्णित’ श्रेणीतील जास्तीत जास्त रहिवाशांना या शिबिराचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी नगरसेवकांना केले. स्थानिक नगरसेवकांना प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत अवगत करण्यासाठी आणि धारावीतील अपात्र श्रेणीतील रहिवाशांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये स्थानिक नगरसेवकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने, डीआरपी/एसआरएचे मुख्य र्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai News: पाच महिने उलटूनही भांडुप बस अपघातग्रस्तांना अद्याप शासकीय मदत नाही! राजोल पाटील यांची बेस्ट भवनात धाव

“मुंबई महानगरपालिकेच्या फोटोपासमध्ये निर्देशित केलेल्या तारखेमुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असून अनेकांची पात्रता अनिर्णित राहिली आहे. अद्याप अशा प्रकाराच्या सुमारे ९०% प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून इतर प्रकरणांबाबत पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांची सखोल छाननी केल्यावर पात्रता निश्चित करण्यात येईल” अशी प्रतिक्रिया विपिन पालीवाल यांनी दिली.

काही झोपड्यांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार अनेक वेळा झाल्याने बऱ्याच वेळा झोपडीचा मालक बदलला आहे. अशा प्रकरणांमध्ये पहिल्या व्यवहारापासून अलीकडच्या व्यवहारापर्यंत संपूर्ण तपशील आणि मालकी हक्काच्या हस्तांतरणाबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. “अशा प्रकरणांमध्ये जोवर संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता (चेन ऑफ डॉक्युमेंट) होत नाही, तोवर डीआरपीला सदर बांधकाम वैध ठरविण्याबाबत, मालकी हक्काचा इतिहास पडताळण्याबाबत किंवा पात्रता निश्चित

करण्याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही” असेही त्यांनी स्पष्ट केले. वरच्या मजल्यावरील अनेक रहिवाशांना (शासन निर्णयात नमूद केल्यानुसार) आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही आणि यातील बहुतेक रहिवाशी मूळचे धारावीकर नाहीत, अशीही माहिती पालीवाल यांनी दिली.

“जोवर तळमजल्यावरील कुटुंब सर्वेक्षण प्रक्रियेत पात्र होत नाही, तोवर वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांची पात्रता निश्चित करता येणार नाही. अशा वेळी वरच्या मजल्यावरील रहिवाशांचे स्वघोषणा पत्र (ॲफीडीव्हीट) विचारात घेतले जाणार नाही.याच कारणामुळे अनेक रहिवाशांचा समावेश अनिर्णित श्रेणीत करण्यात आला आहे” अशी माहिती पालीवाल यांनी दिली. बैठकीला नगरसेवक भास्कर शेट्टी (शिवसेना), नगरसेविका अर्चना शिंदे, जोसेफ कोळी, हर्षला मोरे (तिघेही उबाठा) यांसह आशा काळे आणि साजिदाबी बब्बू खान या काँग्रेसच्या २ नगरसेविका उपस्थित होत्या.

‘अनिर्णित’ श्रेणीतील धारावीकर, ही प्रकल्पातील मोठी समस्या होती. यामुळे धारावीत संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. याचाच गैरफायदा घेऊन काही लोकांकडून अपप्रचार केला जात होता. मात्र, आता याप्रकरणी डीआरपीच्या मदतीला स्थानिक नगरसेवक आल्याने स्थानिकांमधील बरेचसे गैरसमज आपोआप दूर होतील. ‘अनिर्णित’ म्हणजे अपात्र नसून केवळ विविध सरकारी यंत्रणांकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांची प्रलंबिल असलेली पडताळणी आहे, ही बाबाही स्थानिकांच्या लक्षात येईल. “हाउसिंग फॉर ऑल, हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दीष्ट असून या प्रकल्पात जास्तीत जास्त धारावीकरांना सामावून घेण्यासाठी डीआरपी कटिबद्ध आहे” अशी ग्वाही देखील विपिन पालीवाल यांनी दिली.

Mumbai News: मुंबई विद्यापीठात मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षण! राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचा उपक्रम

शिबिरांचे वेळापत्रक व स्थळे

१४ व १५ मे – सेक्टर १
पिंजरा हॉल, सेंट्रल/वेस्टर्न रेल्वे कॉलनी, हनुमान नगर, माटुंगा (पूर्व), मुंबई – ४०००१९
(रेल्वे जमीन व झोन ७)

१८ व १९ मे – सेक्टर ३
शेड कॉम्प्लेक्स, धारावी पोलीस स्टेशनमागे, ब्लॉक क्रमांक ५, ट्रान्झिट कॅम्प, इंदिरा नगर, धारावी – ४०००१७

१९ व २० मे – सेक्टर २
शेड कॉम्प्लेक्स, धारावी पोलीस स्टेशनमागे, ब्लॉक क्रमांक ५, ट्रान्झिट कॅम्प, इंदिरा नगर, धारावी – ४०००१७

२० व २१ मे – सेक्टर ४
म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक ५, धारावी डेपो रोड, पीएमजीपी कॉलनी, आंबेडकर नगर, धारावी, मुंबई – ४०००१७

२१ व २२ मे – सेक्टर ५
म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक ५, धारावी डेपो रोड, पीएमजीपी कॉलनी, आंबेडकर नगर, धारावी, मुंबई – ४०००१७

२५ व २६ मे – सेक्टर १
पिंजरा हॉल, सेंट्रल/वेस्टर्न रेल्वे कॉलनी, हनुमान नगर, माटुंगा (पूर्व), मुंबई – ४०००१९
(झोन क्रमांक १, ३, ४, ५ व ६)

Web Title: Dharavi corporators help drp document verification camps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • dharavi
  • Dharavi Redevelopment
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
2

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा
3

NUCFDC Headquarter : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! NUCFDC चे मुख्यालय मुंबईत होणार; अमित शाह यांची घोषणा

Baba Siddique: ‘सुरक्षा वाढवा, आता तुमची वेळ…’, बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकीला जीवे मारण्याची धमकी
4

Baba Siddique: ‘सुरक्षा वाढवा, आता तुमची वेळ…’, बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकीला जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.