मुंबई : महाविकास आघाडीच्या गोटातून महत्त्वाची अपटेड समोर आली आहे. महाविकास आघाडीत विदर्भातील जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेतील मतभेद टोकाला गेल्याची चर्चा आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन्ही गटात जागावाटपामुळे महाविकास आघाडीत काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांनी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. पण विदर्भातील जागावाटपावरून दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा वाद मिटल्याचेही सांगितले. पण आता पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. विदर्भातील जागावाटपासंदर्भात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याने उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे.
हेही वाचा: हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला अन् यवतमाळमध्ये पाऊस जोरदार बरसला
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे मोठ पाऊल उचलण्याच्या तयारी असून 288 जागांवर लढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. पण उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या या बैठकींमुळे चर्चांणा उधाण आले आहे. पण ही काँग्रेस -राष्ट्रवादीवर दबावाची खेळी तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे खरंच वेगळा मार्ग निवडण्याचा विचार करत आहेत का, अशाही चर्चा मातोश्रीवर सुरू झाल्या आहेत.
दरम्यान मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलवल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच काही वेगळे निर्णयही घ्यावे लागतात,असही त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पण विदर्भातील जागांवरून ठाकरे आणि काँग्रेसमधील मतभेद टोकाला गेले आहेत. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार विदर्भात ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत.पण 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील जागांवरून ठाकरे गटा आणि काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य वाढल्याची माहिती आहे.
हेही वाचा: पुण्यात मुख्यमंत्र्यांचा लांबलचक ताफा; वसंत मोरे भडकून म्हणाले,’आयोग झोपा काढतोय?
यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस कायम असून विदर्भातील जागांसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. विदर्भातील जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. शनिवारी (20 ऑक्टोबर) जवळपास 9-10 तास बैठक होऊनही अद्याप जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच आज उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली आहे. ज्या जागांचा पेच आहे अशा जागांसंदर्भात पक्षांतर्गतच चर्चा केली जाणार आहे.