(फोटो- istockphoto)
यवतमाळ : हवामान खात्याने विदर्भात पाऊस राहील, याबाबतची माहिती दिल्यानंतर अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, यवतमाळ शहरात गेल्या 24 तासात पाऊस बरसला. शनिवारी (दि.19) सकाळी अतिशय जोरात पावसाच्या सरी बरसल्या. एकूण 6 मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
हेदेखील वाचा : केंद्राकडून महाराष्ट्राला गुड न्यूज;राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकरांची नियु्क्ती
यवतमाळ तालुक्यात 6.0, बाळगाव 4.1, आर्णी 0.8, उमरखेड 1.9, घाटंजी 0.7, तर संपूर्ण जिल्ह्यातील 1.1 पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सोळा तालुक्यांपैकी दारव्हा, पुसद, महागाव, वणी, झरी जामणी, केळापूर, राळेगाव, आदी ठिकाणी मात्र पाऊस नाही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये 649.8 मिलिमीटर पावसाची गरज होती. मात्र, एकूण पाऊस 863.4 मिलिमीटर झाला आहे. म्हणजे 115 मिलिमीटर अतिरिक्त पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान
काही ठिकाणी शेतमाल अजूनही उभा आहे. सोयाबीन काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अनेक ठिकाणी जोरात पाऊस झाल्याने उभे सोयाबीन देखील खराब होण्याच्या मार्गावर लागले आहे. कपाशीच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे.
किमान 50 टक्के कापूस शेतकऱ्यांनी घरी
किमान 50 टक्के कापूस शेतकऱ्यांनी घरी आणला आहे. तर 50 टक्के कापूस अजूनही शेतात आहे. पावसाचे येणे असेच राहिले, तर सोयाबीनसह कापसालाही मोठ्या प्रमाणात फटका बसू शकते, असे एका शेतकऱ्याने सांगितले.
हेदेखील वाचा : वाघोलीतील कंपनीच्या गोदामातून लॅपटाॅप चोरणारे अटकेत; 244 लॅपटाॅप, दोन टेम्पो जप्त