Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Shortage Mumbai: घरगुती सिलिंडरही आता गॅस वर; बुकिंग केल्यानंतर कन्फर्मेशनचा संदेश, प्रत्यक्षात मात्र सिलिंडरची प्रतीक्षा

घरगुती गॅसचे बुकिंग केल्यानंतर कन्फर्मेशन मेसेज मिळत असला तरी प्रत्यक्ष सिलिंडर मिळण्यासाठी ग्राहकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅसच्या या टंचाईच्या काळात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 31, 2026 | 12:43 PM
घरगुती सिलिंडरही आता गॅस वर; बुकिंग केल्यानंतर कन्फर्मेशनचा संदेश, प्रत्यक्षात मात्र सिलिंडरची प्रतीक्षा

घरगुती सिलिंडरही आता गॅस वर; बुकिंग केल्यानंतर कन्फर्मेशनचा संदेश, प्रत्यक्षात मात्र सिलिंडरची प्रतीक्षा

Follow Us
Follow Us:
  • घरगुती सिलिंडरही आता गॅस वर
  • बुकिंग केल्यानंतर कन्फर्मेशनचा संदेश,
  • प्रत्यक्षात मात्र सिलिंडरची प्रतीक्षा
  • प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले
जितेंद्र मल्लाह । नवराष्ट्र मुंबई: आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई प्रामुख्याने हॉटेल्स आणि रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांना सतावत होती; मात्र, हे संकट आता लोकांच्या घरांपर्यंत पोहोचू लागले आहे. गॅसच्या या टंचाईच्या काळात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्राहकांना सिलिंडर बुक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच डिलिव्हरी कन्फर्मेशनचा संदेश मिळत असला, तरी प्रत्यक्षात मात्र सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचतच नाहीत.

हक्काचा गॅस काळ्या बाजारात वळवून विकला जात असल्याचा संशय, यामुळे वितरक आणि सरकार या दोघांविरुद्धही जनतेचा संताप सातत्याने वाढत आहे. हवालदिल झालेले लोक गॅस एजन्सींकडे धाव घेत आहेत, ताटकळत राहूनही सिलिंडर उपलब्ध होत नाही. खार पूर्वेतील वैष्णव गॅस एजन्सीमध्ये अशीच परिस्थिती आहे.

हृदयरुग्णांना ‘त्या दिवशीच डिस्चार्ज’ शक्य! केईएम रुग्णालयातील नव्या सुविधांनी रुग्णांना मोठा दिलासा

वैष्णव गॅस एजन्सीकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्यामुळे हताश झालेल्या संतप्त नागरिकांनी निर्मल नगर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या सुमारे १५ व्यक्ती अशा होत्या, ज्यांना सिलिडर वितरणाचा पुष्टीकरण संदेश मिळाला होता.

परंतु त्यांना अद्याप प्रत्यक्ष गॅस सिलिंडर्स मिळालेले नव्हते. पोलिस अधिकाऱ्यांनी एजन्सीचे मालक जयेश कावळे यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तिथे, कावले यांनी या अडचणींचे कारण पुरवठ्यातील कमतरता असल्याचे सांगितले. ग्राहकांच्या सर्व तक्रारी दोन दिवसांच्या आत सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले

३ मार्चला गॅस सिलिंडर बुक केला होता अन् सिलिंडर 66 वितरणाची पुष्टी करणारा संदेशही आला. पण आठवडा उलटला तरीही सिलिंडर मिळालेला नाही. सलग दोन तास रांगेत उभा राहिलो. आता रांगेत उभे राहण्याची ही तिसरी वेळ आहे, अशी माहिती खार स्थानिक रहिवासी आदिल यांनी दिली.

गोवंडी, विक्रोळीतीही संकट

केवळ वांद्रेच नव्हे, तर गोवडी, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी आणि अंधेरीच्या काही भागांतूनही गॅस वितरणातील अनियमितता आणि वितरकांविरोधात होणाऱ्या आंदोलनांच्या बातम्या समोर येत आहेत. इथेही, गॅस रिफिलची नोंदणी (बुकिंग) केल्यानंतर २० दिवस उलटूनही गॅसचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

कांदिवलीत ‘टोकन पद्धत’

कांदिवली (पूर्व) येथील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. लोकंडवाला टाउनशिपमध्ये, पुरुष, स्त्रिया आणि अगदी लहान मुलेही रिकामे सिलिंडर्स हातात घेऊन तासंतास रांगेत उभी होती. सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला-ज्यासाठी त्यांनी मेगाफोन्सचा वापर केला आणि ‘टोकन पद्धत’ आणि पा ग्राहकांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होणे अजूनही सुरूच आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवडवानंतर घरगुती गैस सिलिंडरही आता मिळेनासा झाला आहे.

Mumbai News: हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की

Web Title: Domestic lpg delay booking confirmation but cylinder delivery pending news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • LPG
  • Mumbai

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
2

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
4

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.