छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅससाठी १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असून अनेक पंपांवर साठा संपला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
आज शुक्रवार, २४ एप्रिलपासून हा पुरवठा प्रत्यक्ष सुरू होत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील कच्चे तेल आणि गॅस पुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून देशात गॅस टंचाई जाणवत…
केवळ घरगुती वापरासाठीच नाही, तर स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले.
Pune PNG Gas Connection : पीएनजी गॅस जाळ्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी पीएनजीचा वापर वाढविणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
अमेरिका-इराण शस्त्रसंधी असूनही, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणाव कायम आहे. तेल पुरवठ्यातील व्यत्यय आणि वाढत्या किमतींचा परिणाम भारतासह आशियाई देशांवर होत आहे.
इस्त्राइल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळे व्यावसायिकांना गॅस टाकीचा तुटवडा जाणवू लागला आहे.
अहिल्यानगरच्या ग्राहक भंडार परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडर पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या भीषण इंधन आणि गॅस टंचाईमुळे नाशिकमधील औद्योगिक वसाहतींमधील चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम ७ ते ८ हजार कामगारांच्या रोजगारावर झाला.
नालासोपाऱ्यात गॅस सिलेंडर टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. एकीकडे सरकार गॅस तुटवडा नसल्याचा दावा करतंय तर दुसरीकडे हॉटेल चालकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाहीत.
मीरा-भाईंदर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मीरा रोड येथील देव मोगरा गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून १४.२ किलोच्या सिलेंडरमध्ये आता फक्त १० किलो गॅस मिळणार आहे. दरांमध्येही एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक झाला.