Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

अन्नधान्याची उचल आणि वितरण निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आगाऊ नियोजन करावे. तसेच अन्नधान्याचा काळाबाजार, अवैध साठेबाजी किंवा गैरव्यवहार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2026 | 12:04 PM
दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; मोफत अन्नधान्य मिळणार

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; मोफत अन्नधान्य मिळणार

Follow Us
Follow Us:
  • 265 तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा
  • नवीन लाभार्थ्यांचाही समावेश
  • काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता
मुंबई : जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यातील पर्जन्यमानाची तूट आणि अन्य कारणांमुळे दुष्काळाचा ‘ट्रिगर-1’ लागू करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात जीआर जारी केला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत मोफत अन्नधान्य दिले जाते. दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य विनाविलंब उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे रोजगार किंवा पाण्याच्या उपलब्धतेसाठी शेतमजूर व नागरिकांचे शहरी, निमशहरी किंवा अन्य भागात स्थलांतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘वन नेशन वन रेशन कार्ड ‘अंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या रास्तभाव दुकानाव्यतिरिक्त इतर सोयीच्या रास्तभाव दुकानातूनही अन्नधान्य घेता येणार आहे.

नवीन लाभार्थ्यांचाही समावेश

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींनी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोफत अन्नधान्याची मागणी केल्यास, निर्धारित निकष, उत्पन्न आणि उपलब्ध इष्टांकाच्या मर्यादेत त्यांचा अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब प्रवर्गात समावेश करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून संबंधितांना तत्काळ अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता

अन्नधान्याची उचल आणि वितरण निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आगाऊ नियोजन करावे. तसेच अन्नधान्याचा काळाबाजार, अवैध साठेबाजी किंवा गैरव्यवहार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या (Maharashtra Drought) गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली (New Delhi) येथे भेट घेतली. या भेटीत राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांना दिली जात असलेली मदत आणि केंद्राकडून आवश्यक असलेल्या आर्थिक सहाय्याबाबत चर्चा करण्यात आली.

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Web Title: Drought affected talukas will receive free food grains from the maharashtra government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Government Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
1

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
2

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
3

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
4

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.