Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : मंत्री, अधिकाऱ्यांसाठी लागणार १०५० वाहने; दुष्काळ असतानाही वाहनांची रेलचेल

Nagpur News : नागपुरातील ७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाकडून १,०५० शासकीय वाहने अधिग्रहित केली जाणार आहेत. तर पोलिस बंदोबस्तासाठी २,२०० वाहने तैनात राहतील. अधिवेशनाच्या तयारीसाठी १२९ कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 23, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अधिवेशनासाठी १,०५० वाहनांची जुळवाजुळव
  • पोलिसांच्या बंदोबस्तासाठी २,२०० वाहनांची व्यवस्था
  • तयारी अंतिम टप्प्यात; १२९ कोटींच्या कामांचा आराखडा
Nagpur News : नागपुरात ७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने तब्बल १,०५० शासकीय वाहने अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र २,२०० वाहने तैनात केली जाणार आहेत. राज्यात दुष्काळाचे संकट असताना अधिवेशनाच्या वाहन व्यवस्थेवर होणारा खर्च आणि इंधनाचा अतिरिक्त भार यामुळे सरकारी काटकसरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अधिवेशनासाठी १,०५० वाहनांची जुळवाजुळव

हिवाळी अधिवेशनासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विधिमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही वाहने वापरली जाणार आहेत. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद आणि विविध विभागप्रमुखांना पत्र पाठवले आहे.

नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील महापालिका, नगरपालिका तसेच शासकीय कार्यालयांकडून वाहने उपलब्ध करून घेतली जाणार आहेत. २३ नोव्हेंबरपासून वाहन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार असून, ५ डिसेंबरपर्यंत सर्व वाहने नागपुरात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनासोबत शासकीय चालक देणे बंधनकारक आहे. चालक उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था संबंधित विभागाला करावी लागणार आहे.

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम

पोलिसांच्या बंदोबस्तासाठी २,२०० वाहनांची व्यवस्था

अधिवेशनाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाकडूनही मोठी वाहन व्यवस्था केली जाणार आहे. अधिग्रहित करण्यात येणाऱ्या १,०५० वाहनांव्यतिरिक्त पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सुमारे २,२०० वाहने तैनात राहणार आहेत. यामध्ये नागपूर शहर पोलिसांची जवळपास १,२०० वाहने असून, अन्य जिल्ह्यांतून ९०० हून अधिक वाहने मागवली जाणार आहेत.

बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाईल. अधिग्रहित वाहनांवरील इंधन आणि देखभालीचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात वाहन व्यवस्थेवर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

तयारी अंतिम टप्प्यात; १२९ कोटींच्या कामांचा आराखडा

हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन परिसरातील तयारीला वेग आला आहे. मंडप उभारणी, रोषणाई, कार्यालयीन व्यवस्था आणि आमदार निवासातील कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिवेशनाच्या तयारीसाठी सुमारे १२९ कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा तयार केला आहे.

२८ नोव्हेंबरपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नागपुरात आगमन सुरू होणार आहे. २ डिसेंबरपर्यंत अधिवेशनाशी संबंधित सर्व तयारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. दुसरीकडे, राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची व्यवस्था करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने होणारा इंधन, देखभाल आणि इतर खर्च पाहता सरकारी खर्चात काटकसर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Nagpur news winter session 1050 government vehicles 2200 police vehicles cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Government Decision
  • marathi film
  • Nagpur News
  • police security

संबंधित बातम्या

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम
1

Nagpur News : २६ वर्षांत बदलले ३३ डीसीपी; अधिकारी बदलतात, पण शहराच्या वाहतुकीचे प्रश्न कायम

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
2

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
3

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर
4

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.