Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: “निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या”, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश

निवडणुका संपल्यानंतर आता पक्षवाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना दिले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2026 | 06:56 PM
महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्याचा सूचना
  • लोकप्रतिनिधींनीही कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेत योगदान द्यावे
  • काम नाही तर पद नाही, पदाधिकाऱ्यांना दिला सज्जड दम
मुंबई : निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झालाय. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली.

नुकताच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा व मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवावा तो मी स्वतः बघणार, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला कायदेशीर आव्हान! प्रियाताई शिंदे यांच्या ‘ओबीसी’ प्रमाणपत्रावर आक्षेप; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या ‘एसआयआर’ मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या? याची विचारणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना केली. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार, असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला. मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए’सोबत रोज बैठक घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

संपर्क प्रमुखांना केलेल्या सूचना

– मतदार संघाचा दौरा करणे, बैठका घेणे
– मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करा
– ‘एसआयआर’साठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत
– ‘बीएलए’सोबत दररोज बैठक घेणे
– लोकसभा संपर्कप्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेणे
– बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठवणे

नुकताच केली होती संपर्क प्रमुखांची घोषणा

शिवसेनेने विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुखांची, लोकसभा संपर्क प्रमुखांची नुकताच घोषणा केली होती. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत आमदार निलेश राणे, आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते, आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

डोंबिवली पश्चिमेलाही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय, आमदार रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

Web Title: Eknath shinde directs focus on party expansion after elections maharashtra contact heads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार
1

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी
2

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी
3

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
4

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.