Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Satara News: सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वाई शहरातील कृष्णा नदीकाठच्या शेकडो वर्षांचा वारसा लाभलेल्या घाटांचे अस्तित्व विकासकामांमुळे धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. वाई नगरपालिकेकडून सांडपाणी व्यवस्था आणि पदपथाची कामे सुरू असून या कामांदरम्यान अनेक ठिकाणी जुन्या स्थापत्याची तोडफोड झाल्याचे समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 03:20 PM
विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Follow Us
Follow Us:
  • वाईचे ऐतिहासिक घाट, पार धोक्यात
  • विकासकामांच्या रेट्यात चिरेबंदी बांधकामाचे नुकसान
  • कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
वाई, सचिन ननावरे : शेकडो वर्षांचा इतिहास आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या वाईच्या कृष्णाकाठच्या ऐतिहासिक घाटांचे मूळ स्वरूपच विकासाच्या नावाखाली धोक्यात आले आहे. सध्या शहरात सांडपाणी व्यवस्था, पदपथाची कामे सुरू असून यासाठी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. ब्राह्मणशाही रामडोह आळी घाटावरील अनेक रेखीव चिरे गायब झाले आहेत. या सर्व प्रकाराबद्दल वाईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाई हे ऐतिहासिक शहर आहे. शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे, घाट आहेत. शहरालगत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावर तर काशीविश्वेश्वर, महा गणपतीसह अनेक मंदिरे, चिरेबंदी घाट आहेत. वाईतील हे घाट राज्याचे भूषण आहेत. सध्या नगरपालिकेकडून या घाटालगत सांडपाणी व्यवस्था, पदपथाची कामे सुरू आहे. मात्र, ही कामे करताना अनेक ठिकाणी या जुन्या स्थापत्याला धक्का लागला आहे. ठेकेदाराच्या या बेजबाबदार नियोजनामुळे घाटांच्या वारसास्थळाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Ratnagiri: धरण उशाला अन् कोरड घशाला, रत्नागिरी पालिकेकडून नागरिकांना त्रास देण्याचे काम?

ब्राह्मणशाही घाटावर पूर्वी भाविक व पर्यटकांसाठी विसावा ठरलेले चार दगडी पार होते. या पारांची मोडतोड झाली आहे. याबाबत अनेक सामाजिक संस्थांनी पत्रव्यवहार करून पार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने तसे आश्वासन दिल्याचे नागरिक सांगतात. मात्र, सद्यःस्थितीत चारपैकी एक पार तर पूर्णपणे गायब झाला आहे, तर उर्वरित तीन भग्नावस्थेत पडून आहेत. हे पार कोणी हटवले. गायब झालेला पार कुठे गेला असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दुसरीकडे, कोजागरी पौर्णिमेचे दीपप्रज्वलन आणि पारंपरिक गणेश विसर्जनाचा मार्ग असलेल्या रामडोह आळीतील ऐतिहासिक पायऱ्यांचीही या विकासकामांमध्ये मोठी वाताहत झाली आहे. विस्कटलेले दगड आणि सिमेंट-फरशीच्या अवाजवी वापरामुळे घाटांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असल्याचा आरोप होत आहे.

पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेता, कोणतेही सर्वेक्षण न करता हे काम सुरू आहे का असा सवाल उपस्थित करत विकासकामांची करण्याची मागणी जोर धरत आहे. वाईचा विकास जरूर व्हावा; परंतु तो करताना समृद्ध इतिहासाची मोडतोड करून नव्हे, अशी ठाम भूमिका वाईकरांनी घेतली आहे. गायब पार तातडीने शोधून सर्व नुकसानग्रस्त रचना मूळ दगडी धाटणीतच पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वाईकरांनी दिला आहे.

पालिकेने पदपथ आणि इतर कामे करताना ब्राह्मणशाही आणि रामडोह आळी येथील जुने ऐतिहासिक पार आणि दगडी पायऱ्या काढून टाकल्या आहेत. यामुळे ऐतिहासिक स्थापत्याचे नुकसान झाले असून ही तोडफोड तातडीने दुरुस्त करून देण्यात यावेत यासाठी पालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही दुरुस्ती तातडीने करून द्याव्यात. श्रेयस खटावकर, सरपंच, कृष्णाबाई संस्थान घाट, ब्राह्मणशाही, वाई.

वाई शहरात ब्राह्मणशाही आणि रामडोह आळी या भागात पदपथ आणि सांडपाणी व्यवस्थेची कामे सुरू आहेत. या कामाच्या वेळी जुन्या ऐतिहासिक कामांना थोडी हानी पोहोचली आहे. मात्र, ठेकेदाराला हे बांधकाम पूर्ववत करण्याची अट घातली आहे. त्याच्याकडून हे काम लवकरच पूर्ण करून घेतले जाईल, अशी माहिती वाई मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी दिली.

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष

Web Title: Wai historic krishna river ghats damaged during development work satara heritage conservation controversy sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष
1

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
2

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
3

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.