Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा; शेतकरी महिला विधेयक विधानसभेत संमत

हेरील राज्यातील महिला शेतमजूर अथवा प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळाला तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी मांडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2026 | 01:22 PM
राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा; शेतकरी महिला विधेयक विधानसभेत संमत

राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा; शेतकरी महिला विधेयक विधानसभेत संमत

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मंजुरीसाठी विधानसभेत मांडले. सत्ताधारी बाकांसह विरोधी आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुकुटपालन तसेच इतर शेती सलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार आहे.

महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. बाहेरील राज्यातील महिला शेतमजूर अथवा प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळाला तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी मांडला. मात्र, बाहेरील राज्यातील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शेतजमीन महिलांच्या नावावर करणे हा विधेयकाचा उद्देश नाही, कृषी क्षेत्र अथवा कृषी सलग्न क्षेत्रात ज्या महिला काम करतात, त्यांना स्वतःची शेतकरी म्हणून ओळख मिळावी, हा याचा उद्देश आहे. महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा उद्देश यामागे आहे.

सात-बारावर महिलांची नावे यावीत

महिलांची फसवणूक करू नका. सात-बारावर महिलांची नावे नोंद करा. पतीच्या नावावरील ५० टक्के जमीन महिलेच्या नावावर नोंद करा, कर्ज देताना वित्तीय संस्था महिला शेतकऱ्यांना विनातारण कर्ज देणार आहेत का, याचीही माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

विरोधकांकडून टीका

राज्य सरकारने विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडल्यानंतर त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या विधेयकावर बोलताना कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांना मिश्कील टोला लगावला. महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देणारे हे विधेयक महाराष्ट्राला देशातील पहिले राज्य बनवेल, असे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी विधेयक मांडताना सांगितले.

विधेयकात स्पष्टता नाही

सरकारवर टीका करताना, या विधेयकात महिलांना प्रत्यक्षात कोणते अधिकार किंवा लाभ मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे सांगितले. हे विधेयक बाहेरील कोणाकडून तयार करून घेतल्यासारखे वाटते. महिलांची मते डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असून, ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव कमी होत असल्याने हे विधेयक आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

Kalyan News : कल्याणमध्ये खळबळ ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

Web Title: Farmer status for women in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Government Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
1

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील
3

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
4

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.