
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. तर, चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
[read_also content=”फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांना दिलासा मिळणार? आरोपांतून मुक्ती मिळावी यासाठी शुक्लांचा कोर्टात अर्ज, दिलं ‘हे’ कारण https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/rashmi-shuklas-application-in-court-to-get-acquittal-in-phone-tapping-case-nrps-359792.html”]
काल रात्री 11 च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हद्दीत अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईच्या निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि अपघातात धडक दिलेल्या टॅंकरचा चालक मात्र पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
https://fb.watch/hUIIHLINBb/
काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे अपघात झाला होता. या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाला त्यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती.