Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकनाथ शिंदेजी, राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून…’ वर्षा गायकवाडांचा शिंदेंवर निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत टीका केलेली असतानाच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंना प्रत्युत्तर देत, देशाचे नेते राहुल गांधींवर टीका करण्याची तुमची पात्रता नसल्याचे बोलत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 08, 2026 | 07:03 PM
Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Follow Us
Follow Us:

देशभरात राजकीय घडामोडीना आता वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकाटिपण्या, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडात आहेत. राजधानी दिल्लीत आज पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरून भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत टीका केलेली असतानाच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंना प्रत्युत्तर देत चांगलीच आगपाखड केली आहे. देशाचे नेते राहुल गांधींवर टीका करण्याची तुमची पात्रता नसल्याचे बोलत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

आज (सोमवार, ८ जून) दिल्लीत इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. संपूर्ण देशभराचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत हजार राहू शकले नाहीत. त्यांनी ऑनलाईन मीटिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. आता यावरून इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. यावरून वर्षा गायकवाड यांनी आपल्या X अकाऊंटवरून एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “एकनाथ शिंदेजी, देशाचे नेते, जननायक राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून सत्ता मिळवणारे तुम्ही जनसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या राहुलजींवर टीका करता? हा तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार आहे. सत्तेसाठी स्वतःचा पक्ष, विचार आणि जनतेने दिलेला विश्वास पायदळी तुडवणाऱ्यांनी लोकशाहीच्या मूल्यांवर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे.”

एकनाथ शिंदेजी, देशाचे नेते, जननायक राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून सत्ता मिळवणारे तुम्ही जनसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या राहुलजींवर टीका करता? हा तर सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार आहे. सत्तेसाठी स्वतःचा पक्ष, विचार आणि जनतेने… pic.twitter.com/snWJyezCPe — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 8, 2026

“तुमच्या स्वतःच्या पक्षात असंतोष धुमसत आहे. भाजप स्लो पॉयझनसारखं तुमच्या पक्षाला कमकुवत करतंय, असं तुमचेच आमदार म्हणताहेत. अशा वेळी स्वतःच्या घराला लागलेली आग विझवण्याऐवजी दुसऱ्यांच्या घरात डोकावणं बंद करा! इंडिया आघाडी एकजुटीने व मजबुतीने जनतेचे प्रश्न मांडत आहे. शेवटी एवढंच सांगेन, दिल्लीसमोर नतमस्तक होऊन मिळवलेली खुर्ची आणि जनतेच्या विश्वासातून मिळवलेले नेतृत्व यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक असतो, हे लक्षात ठेवा,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘इंडिया आघाडी गलितगात्र; विरोधकांचे मनोबल खच्ची,’ एकनाथ शिंदेंचा घणाघात; फेसबुक लाईव्हवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा 

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत एकनाथ शिंदेनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, “देशभर बैठका घेतल्या जात असल्या तरी त्यामागे ठोस दिशा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील अनेक वर्षे देशाचे नेतृत्व करतील, कारण त्यांना १४० कोटी भारतीयांचा आशीर्वाद आणि विश्वास लाभला आहे. राहुल गांधींनी आधी स्वतः सातत्याने देशात राहून काम करून दाखवावे, त्यानंतरच मोदींवर टीका करावी,” असा टोला त्यांनी लगावला. ज्येष्ठ नेते शरद पवार, ममता बॅनर्जी या नेत्यांनी देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या सातत्याबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “देशात असताना आणि देशाबाहेर गेल्यानंतरही पंतप्रधानांची बदनामी करण्याचे राजकारण सुरू आहे. ही कसली देशभक्ती आहे,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं ही माझीही मागणी,’ बच्चू कडूंनंतर उदय सामंत यांचेही मोठे वक्तव्य, महायुतीत तिढा?

Web Title: Varsha gaikwad slams eknath shinde over remarks on rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.