Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई ते नाशिकदरम्यान सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना काही प्रमाणात यश मिळाले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना पाठिंबा दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 05:11 PM
Nashik Politics, MLC Election, Devendra Fadnavis, Eknath Shinde,

Nashik Politics, MLC Election, Devendra Fadnavis, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  • भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची माघार
  • प्रसाद हिरेंच्या माघारीमुळे महायुतीला दिलासा
  • गोकुळ गीतेंच्या  मनधरणीचे प्रयत्न सुरू
 

Nashik Politics: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. पण त्यानंतरही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.

महायुतीतील सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळ गीते यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

PCMC anti encroachment: पहाटे ३ वाजता महापालिकेचा बुलडोझर; चिखली-कुदळवाडीतील कारवाईवरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप

प्रसाद हिरे यांची माघार; महायुतीला दिलासा

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई ते नाशिकदरम्यान सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना काही प्रमाणात यश मिळाले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना पाठिंबा दिला आहे.एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याोबत झालेल्या चर्चेनंतर हिरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

गोकुळ गीते ठाम; मनधरणीचे प्रयत्न सुरू

मात्र गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अद्याप उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची माघार घडवून आणण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन प्रयत्न करत आहेत. “आम्ही कोणावरही दबाव टाकत नसून केवळ विनंती करत आहोत. गोकुळ गीते सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट टाळणारे गोकुळ गीते यांची नाशिक विमानतळावर गिरीश महाजन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळपास तासभर चाललेल्या या चर्चेत तोडगा निघण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

उद्यापर्यंत तिढा सुटण्याची शक्यता

मुख्यमंत्री फडणवीस आणि गोकुळ गीते यांच्यात झालेल्या संवादानंतर आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते नाशिकमधील बंडखोरी पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्नशील असून, उद्यापर्यंत या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Prasad hire withdraws nashik gokul gite independent candidate nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • MLC Election
  • Nashik Politics

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.