Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कँटीनमध्ये ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात घेऊन संबंधित कँटीन सील करण्याचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2026 | 06:58 PM
मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका
  • ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश
  • ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याने कारवाई
FDA On BMC Canteen News Marathi: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यभरात अन्नसुरक्षेसंदर्भात व्यापक तपासणी मोहीम राबवत असून, निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करत आहे. याच मोहिमेअंतर्गत मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील कँटीन तात्काळ बंद करून सील करण्याचे आदेश FDA ने दिले आहेत.

ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याने कारवाई

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कँटीनमध्ये ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याची घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कँटीन सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तक्रारीनंतर FDA अधिकाऱ्यांनी सुमारे पाच तास कँटीनची सखोल तपासणी केली. तपासादरम्यान स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कँटीनचे संचालक कमल कॅटरर्स यांना ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावण्यात आली आणि कँटीन सील करण्याचे आदेश देण्यात आले.

मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड

BMC कडूनही 50 हजारांचा दंड

या प्रकरणाची गंभीर दखल घेत BMC च्या आरोग्य आणि कामगार विभागाने संबंधित ठेकेदारावर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेत निष्काळजीपणा केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभर अन्नसुरक्षा तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत यापूर्वी KEM रुग्णालयाच्या कँटीनसह अनेक खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वीही अनेक ठिकाणी धडक कारवाई

याआधी पुण्यात सिया गोयल यांच्या कुटुंबाच्या मसाले आणि सुका मेवा विक्रीच्या दुकानाला कथित नियमभंगामुळे व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. तसेच मुंबईतील प्रसिद्ध K. Rustom Ice Cream Parlour चा फूड लायसन्स उंदीर आणि माश्या आढळल्याच्या तक्रारीनंतर निलंबित करण्यात आला होता. याशिवाय, राज्यातील विविध भागांत भेसळयुक्त दूध आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातही FDA सातत्याने कारवाई करत आहे. FDA ने नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहण्याचे आणि कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ प्रशासनाकडे नोंदवण्याचे आवाहन केले आहे.या घटनेनंतर BMC प्रशासनालाही कँटीनमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. चौकशी अहवालानंतर आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Jogeshwari News: जोगेश्वरीत FDA ची धडक कारवाई; १०.९४ लाखांचा विनालेबल साबण जप्त

Web Title: Fly found in buttermilk fda orders sealing of bmc canteen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • BMC
  • FDA
  • Mumbai

संबंधित बातम्या

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
1

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन
2

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का
3

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.