Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fourth Mumbai: ‘चौथी मुंबई’ अस्तित्वात येणार, पण कुठे? वाचा सविस्तर

मुंबई पासून साधारण 125 किलोमीटर अंतरावर वाढवण बंदर आहे. याठिकाणी देशातील सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या दहा मोठ्या बंदरां पैकी एक असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जाणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 08, 2025 | 06:09 AM
चौथी मुंबई' अस्तित्वात येणार, पण कुठे? वाचा सविस्तर

चौथी मुंबई' अस्तित्वात येणार, पण कुठे? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

मुंबई पासून साधारण 125 किलोमीटर अंतरावर वाढवण बंदर आहे. याठिकाणी देशातील सर्वात मोठे आणि जगातील पहिल्या दहा मोठ्या बंदरां पैकी एक असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जाणार आहे. या बंदराच्या निमित्ताने राज्य सरकारने 13 गावातील 33.88 चौ. किमी क्षेत्रामध्ये विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 107 गावांतील 512 चौ. किमी क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वाढवणजवळ नवी मुंबई सारखी ‘चौथी मुंबई’ वसणार आहे.

केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदरापासून मुंबई-दिल्ली पश्चिम रेल्वे मार्ग अगदी जवळ आहे. शिवाय पश्चिम रेल्वे लगतच समर्पित मालवाहू रेल्वे कॉरिडोर (DFCC), सध्या युद्धपातलीवर काम सुरू असलेला मुंबई – वडोदरा एक्सप्रेस वे आणि साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. शिवाय येथेच समृद्धी महामार्ग देखील जोडला जाणार आहे.  बंदारात येणारा माल रेल्वे आणि रस्ते मार्गाने देशभर पोहोचवता येईल, असं सरकारचं धोरण आहे. त्यात आता एमएसआरडीसी 388 किमी लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि 498 किमी लांबीचा रेवस रेडी सागरी किनारा मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पालगत 105 गावांतील 449.3 चौ. किमी क्षेत्रावर 13 विकास केंद्र होणार आहेत. या विकास केंद्रांमध्ये वाढवण विकास केंद्राचाही समावेश आहे.

पालघर जिल्हा हा मुंबईपासून जवळ असला तरी, जिल्ह्याच्या विकासामध्ये मात्र मोठी तफावत आहे. एकीकडे देशातील सर्वात मोठे आणि सुसज्य असे जिल्हा मुख्यालय आहे. तर दुसरीकडे जव्हार, मोखाडा विक्रमगड, तलासरी येथील लोकांना रोजगारासाठी आजही स्थलांतर करावं लागतं, अशी स्थिती आहे. मोठ्या किंवा महत्वाच्या उपचारासाठी रुग्णाला मुंबई किंवा गुजरातला न्यावं लागत. त्यामुळे वाढवण बंदरालगत शहर उभारलं गेल्यास स्थानिक नागरिकांना सर्व मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध होतील असे येथील नागरिकांचे मत आहे.

देशातील सर्वात मोठे बंदर ठरणाऱ्या ‘वाढवण’लगत आणखी एक शहर अर्थात चौथी मुंबई वसविण्याचे सरकारचे नियोजन आहे. यामध्ये वाढवण जवळील वंधवन, आंबीस्तेवाडी, वसगाव, वरोर, ताडियाले, धुमकेत, गुंगावडा, पोखरण,  बहाडा-पोखरण, चांदेगाव आणि धाकटी डहाणू अशा 11 गावांमधील 33.88 चौ. किमी क्षेत्रावर विकास केंद्राचे नियोजन आहे. याचा आणखी विस्तार होणार असल्याची देखील शक्यता आहे. मात्र हा विकास करताना, रोजगारासह इतर गोष्टींमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं, विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर, त्यांच्या उपजीविकेवर, संस्कृतीवर वरवंटा फिरवू नये अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Web Title: Fourth mumba built near palghar near mumbai in maharashtra vadhwan port

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 12:47 AM

Topics:  

  • Mumbai City
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.