Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

कल्याण पश्चिमेतील परीक्षा केंद्रावर मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टदरम्यान संगणक आणि सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा खोळंबली. संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर आंदोलन करत पुनर्परीक्षेची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 05:18 PM
मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमधील परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे टायपिंग टेस्ट खोळंबली.
  • 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन करत पुनर्परीक्षेची मागणी केली.
  • सर्व्हर डाऊन, संगणक बंद आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे उमेदवारांचा संताप वाढला.
 

मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो उमेदवार परीक्षेसाठी दाखल झाले होते. मात्र, परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा केंद्रावर सीटींग व्यवस्थेचे योग्य नियोजन नव्हते. उमेदवारांची तपासणी आणि मार्गदर्शनासाठीही स्पष्ट व्यवस्था नसल्याने सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक संगणक धुळखात पडलेले होते, तर काही संगणक सुरूच होत नसल्याने उमेदवारांना अर्धा तासांहून अधिक वेळ थांबावे लागले.

संगणक सुरू झाल्यानंतरही सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने टायपिंग टेस्ट सुरू होऊ शकली नाही. सकाळी 10 वाजताच्या सत्रातील उमेदवार केंद्रावर अडकले असतानाच सव्वा बारा आणि दुपारी 3 वाजताच्या सत्रातील शेकडो विद्यार्थीही केंद्रावर पोहोचल्याने गर्दी प्रचंड वाढली.

CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!

सर्व्हर डाऊन, संगणक बंद

परीक्षा खोळंबल्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर निषेध आंदोलन केले. दूरवरून आलेल्या उमेदवारांनी पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली. या गोंधळामुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षेची मागणी

परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, परीक्षा केंद्राचे संचालक संजय वानखेडे यांनी तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया आणि परीक्षा वेळापत्रक उशिराने सुरू झाल्याचे सांगितले. समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

Free Online Coaching: UPSC, NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकार देणार मोफत ऑनलाइन कोचिंग

या घटनेमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी संबंधित प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mumbai high court clerk typing test kalyan centre chaos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Career News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
4

Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.