Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईसह देशातील छोट्या शहरांमध्येही वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. पीक अवरमध्ये अनेक शहरांतील वाहनांचा वेग निम्म्याहून अधिक घटत असल्याचे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 03:41 PM
मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

Follow Us
Follow Us:
  • वेग १५ किमी प्रतितासावर.
  • रस्त्यांची रचना ठरते महत्त्वाची.
  • छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा फटका.
देशातील वाहतूक कोंडीची समस्या आता केवळ दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. छोट्या शहरांमध्येही पीक अवरमध्ये वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टट्यूट इंडियाच्या २० शहरांच्या रस्ते अभ्यासातून समोर आले आहे. मोठ्या शहरांमध्ये गर्दीच्या वेळेत वाहनांचा वेग त्यांच्या सामान्य वेगाच्या निम्म्याहूनही कमी होतो. यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच इंधनाचा वापरही वाढत आहे.

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

केवळ रस्त्यांची लांबी नव्हे, रचनेला महत्त्व

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केवळ रस्त्यांची एकूण लांबी वाढविणे पुरेसे नसून रस्त्यांचे जाळे आणि त्याची रचना महत्वाची असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हैदराबादमधील तब्बल ९५ टक्के रस्ते १० मीटरपेक्षा कमी रुंदीचे आहेत. कोलकात्यात हे प्रमाण ९४ टक्के, तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये ९२ टक्के आहे. मुंबईमध्ये मात्र १० मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्याचे प्रमाण ६४ टक्के आहे, चेन्नई, बंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये दुय्यम रस्त्यांचे जाळे एकूण रस्ते नेटवर्कच्या केवळ १० ते १५ टक्के आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा भार येतो आणि पर्यायी मार्गाची कमतरता भासते.

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

मुंबईत वाहनांचा वेग प्रतितास १५ किमीपर्यंत खाली

वर्ल्ड रिसोर्सेस इर्नस्टट्यूट इंडियाच्या अभ्यासानुसार, दिल्लीमध्ये सामान्य परिस्थितीत सुमारे ४६ किमी प्रतितास असलेला वाहनांचा वेग पीक अवरमध्ये अवघ्या १९ किमी प्रतितासावर येतो. हैदराबाद आणि मुंबईत ४० किमी प्रतितासांवरून वेग १५ किमी प्रतितासापर्यंत घसरतो. बंगळुरूमध्ये ३८ वरून १३ किमी प्रतितास, तर कोलकात्यात २९ वरून ११ किमी प्रतितास अशी घट नोंदवण्यात आली आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत मात्र वाहनांचा वेग दिवसभर तुलनेने स्थिर राहतो. त्रिशूरमध्ये प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळी काही काळ वाहतूक मंदावते, तर इंदूरमध्ये दीर्घकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai traffic congestion small cities peak hours vehicle speed drops to 15 kmph wri india report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Mumbai News
  • NAVARASHTRA
  • traffic jam

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.