Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणक्याच्या विकारांवर, महागड्या शस्त्रक्रीया होणार मोफत, ‘स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने संयुक्त उपक्रम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय सहायता कक्षाच्यावतीने आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून “डॉ. शेखर भोजराज” यांच्या “स्पाईन फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेच्या वतीने मणक्याच्या (स्पाईन) आजाराच्या दुर्धर व महागड्या शस्त्रक्रीया मोफत करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2024 | 06:43 PM
मणक्याच्या विकारांवर, महागड्या शस्त्रक्रीया होणार मोफत, ‘स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने संयुक्त उपक्रम

मणक्याच्या विकारांवर, महागड्या शस्त्रक्रीया होणार मोफत, ‘स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने संयुक्त उपक्रम

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने 17 ऑक्टोबर, 2024 पर्यंत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली असून त्यामाध्यमातून नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर 25 हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत या शिबिरांचे आयोजन होत आहे. या सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शासनाचे विविध विभाग, विविध NGOs व लोकसहभागातून ही शिबिरे आयोजित होत आहेत.

शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशन पुढे आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितले आहे.

या शस्त्रक्रीयेंना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या 6 रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रीया डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रीया या महागड्या असून त्याचा खर्च 3 लक्ष ते 5 रुपये लक्ष ऐवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रीया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रीया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ.भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि.17 सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.17 सप्टेंबर, 2024 ते दि.17 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येणार आहे. या उपक्रमअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये, धर्मादाय संस्था, मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व लोक सहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहेत. उप मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री.रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत.

दलित वस्त्या, जनजाती क्षेत्र, झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर 25 हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान दरम्यान सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत या शिबिरांचे आयोजन होणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री, श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबतच 59 प्रकारच्या रक्त चाचण्या, ई.सी.जी. या सारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे. त्यासोबतच आयुष्मान भारत योजना- आभा कार्डचे वाटप केले जाणार आहे. रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. यासाठी उप मुख्यमंत्री कार्यालयांतर्गत ‘राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष समन्वय साधणार आहे.

Web Title: Free health camps across the state on the occasion of modi seva month in collaboration with spine foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
1

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
2

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप
4

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.