Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Mumbai Goa Highway Traffic: तुम्ही जर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी काही वाहनांना बंदी देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या वाहनांचा समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2026 | 01:26 PM
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर 'या' वाहनांना बंदी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर 'या' वाहनांना बंदी

Follow Us
Follow Us:
  • गणपतीत मुंबई-गोवा महामार्गावर मोठा निर्णय
  • १६ टनांवरील वाहनांना ‘नो एन्ट्री’
  • तारखा जाणून घ्या
Mumbai Goa Highway Traffic: अवघ्या काही दिवसांमध्ये लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव सणासाठी अनेक नागरिकांची कोकणात धाव असते. दरवर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. यंदाही एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात येत असून खासगी वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिवहन विभागाने अवजड वाहनांवर निर्बंध लागू केले आहेत.

कोणत्या वाहनांना बंदी?

१६ टन किंवा त्यापेक्षा अधिक Gross Weight असलेल्या अवजड वाहनांना हे निर्बंध लागू असतील. विशेषतः ट्रक, ट्रेलर तसेच रेती-वाळू आणि इतर अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा वाढता प्रवास लक्षात घेऊन ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल.

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी निर्बंध

पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश करता येणार नाही.

गौरी-गणपती विसर्जनावेळीही बंदी

गौरी-गणपती विसर्जन आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.

अनंत चतुर्दशीला सर्वाधिक काळजी

अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर कोकणातून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल.

या वाहनांना मिळणार सवलत

अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ नये म्हणून काही वाहनांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. JNPT आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, LPG सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य आणि नाशवंत मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत असेल. रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांनाही हे निर्बंध लागू होणार नाहीत.

स्थानिक परिस्थितीनुसार बदल शक्य

वाहतूक परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंधांमध्ये आवश्यकतेनुसार शिथिलता देण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात NH-66 वरून प्रवास करणाऱ्यांनी निघण्यापूर्वी स्थानिक वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे लक्ष देणे उपयुक्त ठरेल.

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

Web Title: Ganeshotsav 2026 heavy vehicles banned on mumbai goa highway traffic 66 konkan restrictions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा
1

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
3

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य
4

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.