Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GB Syndrome : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळला

पुणेकरांनंतर आता मुंबईकरांचं टेन्शन वाढलं आहे. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 07, 2025 | 03:19 PM
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळला

मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळला

Follow Us
Close
Follow Us:

पुणेकरांनंतर आता मुंबईकरांचं टेन्शन वाढलं आहे. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला आहे. आतापर्यंत मुंबईत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट रताळ्याचा किस, पदार्थ ठरेल आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका रुग्णाला गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते. या व्यक्तीवर सध्या महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. रुग्णालयाच्या अधिष्ठातांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवाव्यात. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

पार्कमध्ये सकाळसकाळी गवतावर नग्न पायांनी चालण्याचे फायदे काय? जाणून घ्या

पुणे शहरात जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही काही रुग्ण आढळले आहेत. पुण्यात रुग्णांचा आकडा १७३ वर पोहचला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचं निदान झालं आहे. २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या आजारामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जीबीएसचे रुग्ण वाढल्यावर पुणे महापालिकेला जाग आली आहे. पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला महापालिकेकडून टाळं ठोकण्यात आलं आहे. सिंहगड रोड परिसरात १९ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरो प्लांटमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळला आहे.

जीबीएसची लक्षणं –
पाय, हातांमध्ये अचानक अथवा येणे

डायरिया

काय काळजी घ्याल
पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पाणी उकळून पिणे.

अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.

वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खावू नये.

नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.

नांदेड सिटी, किरकिटवाडी, नांदोशी धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव आणि सिंहगड रस्ता परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे महानगरपालिकेने या परिसरातील आरो प्लांटची पाहणी केली होती. त्यामध्ये कॉलिफॉर्म जिवाणू असल्याचं आढळलं होतं. त्यानुसार महापालिकेने या आरो प्लांटला नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर थेट कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान या आजाराने आता राज्यभर पाय पसरायला सुरू केलं आहे.

पुण्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट होत असून, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील तो होऊ शकतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेने या भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी इतक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्यात हे केंद्र उभे केले जाईल. तसेच एनआयव्हीकडून पाण्यांचे नमूने घेताना ते दोन लिटर इतके घ्यावेत, तसेच ते दोन महिने साठवून ठेवून त्याची पुन्हा तपासणी करावी अशा सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून नमूने पाठविण्यासंदर्भात सहकार्य केले जात नसल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे. ’’

Web Title: Gb syndrome first case found in mumbai andheri east guillain barre syndrome health marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • ahealth news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त; मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन!
1

‘हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त; मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन!

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा
2

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Mangal Prabhat Lodha: ४५ ‘आयटीआय’मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा अन् 8 हजार…; Toyota सोबतचा करार काय?
3

Mangal Prabhat Lodha: ४५ ‘आयटीआय’मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा अन् 8 हजार…; Toyota सोबतचा करार काय?

Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना
4

Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.