Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वंदे भारत एक्सप्रेस भरकटली! गोव्याला जायचे होते, कल्याणला पोहोचली; नेमकं कारण काय?

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस दिवा स्थानकानंतर भरकटली. ही एक्स्प्रेस पनवेलच्या दिशेने जाण्याऐवजी ही गाडी कल्याणला पोहोचली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 23, 2024 | 06:38 PM
वंदे भारत एक्सप्रेस भरकटली! गोव्याला जायचे होते, कल्याणला पोहोचली (फोटो सौजन्य-X)

वंदे भारत एक्सप्रेस भरकटली! गोव्याला जायचे होते, कल्याणला पोहोचली (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात भरकटली. दिवा स्थानकातून ही गाडी पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने वळली. ही एक्स्प्रेसस कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली. दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने गाडीला कल्याणमार्गे वळवण्यात आले. या कारणामुळे वंदे भारत एक्सप्रेसला दीड तास विलंबाचा फटका बसला.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दिवा-पनवेल मार्गावर जाणार होती, कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी नियुक्त मार्ग आहे. मात्र ही गाडी सकाळी 6.10 वाजता दिवा स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने वळली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नलमधील त्रुटीमुळे हा गोंधळ उघडकीस आला आहे. दरम्यान दिवा जंक्शन येथे डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक 103 वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला.

मद्यप्रेमींसाठी खुशखबर… थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू, राज्य सरकारचा मोठा निर्णय

दिवा स्थानकात गाडी ३५ मिनिटे थांबली

परिणामी मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अनियमितता समोर आल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात नेण्यात आली आणि काही वेळानंतर ही गाडी दिव्याला परत पाठवण्यात आली. दिवा येथे पोहोचल्यानंतर ही गाडी दिवा-पनवेल या निश्चित मार्गाने मडगावकडे रवाना झाली. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा जंक्शनवर सकाळी 6.10 ते 7.45 या वेळेत सुमारे 35 मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती.

अशा घटना फार दुर्मिळ

गाडी पाचव्या मार्गाने सायंकाळी ७.०४ वाजता कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर पोहोचली आणि सहाव्या मार्गाने सायंकाळी ७.१३ वाजता पुन्हा दिवा स्थानकात आणण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जून २०२३ मध्ये सीएसएमटी-मडगाव या मार्गावर सुरू करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उपनगरीय स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा जोरदार मजबूत आहे. त्यामुळे येथे अशा घटना फार कमी आहेत.

कोल्हापुरातील ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला; आत्महत्येचं कारणही आलं समोर

Web Title: Goa bound vande bharat train deviates from regular route due to technical snag at thane diva station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 06:38 PM

Topics:  

  • Mumbai
  • vande bharat express

संबंधित बातम्या

LPG Gas Shortage: युद्धाचा फटका! छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात
1

LPG Gas Shortage: युद्धाचा फटका! छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात

KEM Hospital : केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य
2

KEM Hospital : केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी
3

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

Mumbai Crime: ‘एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील…चारित्र्यावर आरोप, मानसिक छळ; MDS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय नेमकं प्रकरण?
4

Mumbai Crime: ‘एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील…चारित्र्यावर आरोप, मानसिक छळ; MDS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय नेमकं प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.