
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! (Photo Credit - X)
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी (Ladki Bahin E-KYC) प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे.… pic.twitter.com/t7K1v94EnO — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) November 17, 2025
Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.
या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.
e-KYC का अनिवार्य आहे?
सरकारनुसार, लाभ केवळ खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी e-KYC आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा दुहेरी नोंदी (Double Entry) टाळता येतील. आधार अधिनियम २०१६ च्या कलम ७ नुसार, अनुदान आणि लाभ योग्य व्यक्तीला देण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. UIDAI ने महिला व बाल विकास विभागाला Sub-AUA/Sub-KUA चा दर्जा दिला आहे, ज्यामुळे विभाग स्वतः आधार व्हेरिफिकेशन करू शकतो. यासाठीच योजनेच्या वेबसाइटमध्ये e-KYC सुविधा जोडली गेली आहे.
लाडकी बहिण योजनेचे e-KYC कसे करावे? (स्टेप बाय स्टेप प्रक्रिया)
लाभार्थी महिला काही मिनिटांत घरबसल्या स्वतः e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात:
स्टेप १: वेबसाइटला भेट द्या
योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
स्टेप २: e-KYC वर क्लिक करा
होमपेजवर दिसणाऱ्या ‘e-KYC’ पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ३: आधार आणि OTP
तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि कॅप्चा (Captcha) भरा.
Send OTP वर क्लिक करा.
(नोंद: जर e-KYC आधीच पूर्ण असेल, तर “e-KYC already completed” असा संदेश येईल. तुमचा आधार पात्र यादीत नसल्यास, तसा संदेश स्क्रीनवर दिसेल.)
स्टेप ४: OTP दाखल करा
तुमच्या आधार-लिंक केलेल्या मोबाइलवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) दाखल करा आणि Submit करा.
स्टेप ५: पती/वडिलांचे तपशील
आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक दाखल करा.
कॅप्चा भरा, संमती द्या आणि Send OTP वर क्लिक करा.
पती/वडिलांच्या आधार-लिंक मोबाइलवर आलेला OTP दाखल करून Submit करा.
स्टेप ६: घोषणापत्र (Declarations)
यानंतर, तुम्हाला जातीची श्रेणी (Category) निवडावी लागेल.
पुढील दोन घोषणांवर होय/नाही (Yes/No) निवडावे लागेल:
कुटुंबात कोणताही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नाही.
कुटुंबात केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिलाच लाभ घेत आहेत.
स्टेप ७: अंतिम सबमिशन
सर्व माहिती भरल्यानंतर Submit करा. सबमिट झाल्यावर तुम्हाला पुष्टीचा संदेश मिळेल.