मनसर परिसरामध्ये घनदाट जंगल, रामधाम, चोरबाहुली, फरिस्ट सफारी, पेंच टायगर रिझर्व्ह यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. डीसीचे विभाजन झाल्यास येथील वीज वितरणाचे कार्य सुलभ होईल
शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात वश आजूबाजूच्या परिसरात दुकानांमधरे काही खाद्यपदार्थांची मुलांना विक्री होणार नाहीत, या अनुषंगाने नियमित पोलिस विभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली जात आहे.
परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रु शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आले.
विधीमंडळामध्ये सातत्याने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला जातो. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्याच नेत्यांला खडेबोल सुनावले.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सभागृहात चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि कारवाई सांगितली.
Maharashtra Politics : राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. मात्र हे सरकार कोसळणार असल्याचा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
अधिवेशनाचा कालावधी लहान असला तरीही शनिवार व रविवार असे २ दिवस अधिकचे आहेत. सरासरी ५ तास दिवस काम व्हावे अशी अपेक्षा असताना रोज १० तास सभागृहाचे काम चालते.
महायुतीतीलच घटक पक्षांमध्ये परस्पर नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देणे बंद राहणार आहे. विशेषतः, भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही
मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला अखेर आज सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. काल रात्री एका खाजगी कार्यालयामध्ये ही 20 मिनिटांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले.
राजकीय नेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता. यावर आता निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देत टीकाकार नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड' समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक परिसरात कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामे होत आहेत.
नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे रणजित पाटील अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस नगराध्यक्षपदासह १५ जागांवर स्वबळावर लढत आहे. झाकिर पठाण काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याचा उल्लेख करत तिजोरीची चावी असल्याचे सांगितले होते. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवार यांनी सावरासावर केली.
राजाचा जीव जसा पोपटात असतो तसं भाजपचं झालय अख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा महापालीकेत अडकलाय स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडी म्हणून यापूर्वी निवडणुका कधीच लढवल्या गेल्या नाहीत
CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान लाडकी बहिण योजनेबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.