Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू
सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत ६ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, मतदारांपर्यंत पोहोचणे अनेक उमेदवारांना अद्याप शक्य झालेले नाही. मोठ्या प्रभागांमुळे प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान मोठे आहे. हातात उरलेल्या या ४ दिवसात सभा, पदयात्रा आणि कॉर्नर सभांचे नियोजन कोलमडताना दिसत आहे. त्यातच थंडीचा कडाका आणि मतदारांची उदासीनतेमुळे उमेदवारांची दमछाक होत आहे. प्रभाग पद्धतीच्या या निवडणुकीत राजकीय पक्षांनी ३ किंवा ४ उमेदवारांचे पॅनल मैदानात उतरवले आहे. सुरुवातीला एकच गट, उमेदवार आता मतदानाचा दिवस जवळ येताच विखुरले गेल्याचे चित्र आहे. पॅनलमधील एखादा उमेदवार जनसंपर्कात कमी असेल किंवा मतदारांमध्ये त्याच्याबद्दल नाराजी असेल, तर त्याचा फटका संपूर्ण पॅनलला बसतो, असे बोलले जात आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
प्रभागांत दिग्गज उमेदवारांसोबत असे काही उमेदवार दिले गेले आहेत, ज्यांना राजकारणाचा कोणताही गंध नाही. अशा नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन चालणे दिग्गजांसाठी कठीण जात आहे. त्यांना प्रचाराची पद्धत, मतदारांशी बोलण्याची शैली आणि राजकीय गणिते समजून सांगण्यातच मोठा वेळ खर्ची पडत आहेत.
कमकुवत उमेदवारांमुळे आपण पराभवाच्या खाईत का पडावे? या भावनेतून दिग्गज उमेदवारांनी आता पॅनलचा प्रचार करण्याऐवजी स्वतःच्या वैयक्तिक प्रचारावर आणि स्वतःच्या चिन्हावर भर दिला आहे. अनेक प्रभागांत दिग्गज उमेदवारांनी आपल्या साथीदारांना मागे सारून स्वतंत्रपणे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली.
Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रचाराचा फरक प्रकर्षाने जाणवत आहे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्याने तेथील कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप झालेल्या नाहीत. यामुळे या पक्षांच्या उमेदवारांना प्रचारात एकाकी पडल्यासारखे वाटत असून, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांना वरिष्ठांच्या पाठबळाची फारशी चिंता नसल्याचे दिसत आहे.






