Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; रस्ते जलमय, रेल्वे उशिराने…..

मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2025 | 09:05 AM
लोणावळ्यात मुसळधार पाऊस

लोणावळ्यात मुसळधार पाऊस

Follow Us
Follow Us:

मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहेत. मुसळधार पाऊसामुळे, जलमय रस्त्यांमुळे आणि लोकल उशिरा धावत असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

बोरिवली–ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाला वेग; प्रकल्पासाठी बाधित कुटुंबियांना MMRDA चे तीन पर्याय

पावसाचा जोर दक्षिण मुंबईत अधिक पाहायला मिळत आहे. नरिमन पॉइंटवर ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढतांना बंद पडत आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत किती पाऊस?

मुंबईत गेल्या २४ तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. फोर्ट परिसर हा सर्वाधिक पावसाचा अनुभवलेला भाग असून तिथं ७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ बांद्रा ६२ मिमी, मलबार हिल ६० मिमी, लोअर परळ ५८ मिमी आणि हाजी अली ५७ मिमी पावसासह पुढे आहेत.

यासोबतच इतर प्रमुख भागांत –

ग्रँट रोड व सांताक्रुझ – प्रत्येकी ४७ मिमी

दादर – ४१ मिमी

चर्चगेट – ३८ मिमी

अंधेरी – ३३ मिमी

मुंबई सेंट्रल – ३० मिमी

मुंबई उपनगरांमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असून:

बोरिवली – २८ मिमी

वरळी – २६ मिमी

वांद्रे कुर्ला संकुल – २५ मिमी

वर्सोवा – २३ मिमी

दिंडोशी – २२ मिमी

कल्याण-डोंबिवलीतही पावसाचा जोर
कल्याण आणि डोंबिवली परिसरात सकाळपासून वातावरण ढगाळ आहे आणि रिमझिम पावसाने सुरुवात झाली आहे. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांना काहीशी अडचण झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाचा अलर्ट काय सांगतो?

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचे आगमन झाले असून त्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेले अलर्ट काय सांगतात?

रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ – मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग – ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई आणि ठाणे – ‘यलो अलर्ट’, काही भागांत जोरदार पावसाचा इशारा.

पुणे, कोल्हापूरच्या घाट परिसर व सातारा – आज ‘ऑरेंज अलर्ट’

विदर्भात मान्सूनचा प्रवेश

नागपूरसह विदर्भ परिसरात अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मान्सून आज दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवार ते गुरुवार या कालावधीत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात इंद्रायणी पूल कोसळला; 4 मृत, 51 जणांचा बचाव; मध्यरात्रीपासून सततच्या पावसामुळे रेस्क्यू ऑपरेशनला अडथळा

Web Title: Heavy rain disrupts normal life in mumbai roads flooded trains delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • heavy rains
  • Mumbai
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.