'धोकादायक पर्यटनस्थळे बंद करा'; इंद्रायणी दुर्घटनेनंतर मुख्य सचिव सौनिक यांचे आदेश
पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथील इंद्रायणी पूल रविवारी कोसळला. याने मोठी दुर्घटना घडली. ५१ जणांचा बचाव करण्यात आला तर ४ लोकांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेचा रेस्क्यू ऑपेरेशन काल रात्री १० वाजता थांबिण्यात आला असून ते आज सकाळी ७ वाजता पुन्हा एकदा सुरु करण्याचं नियोजन प्रशासनाचं आहे. पण मध्यरात्रीपासून पुण्यात संततधार थांबायचं नाव घेत नाही आहे. यामुळे आजच्या बचावकार्यात अडथळे येणार आहे. हे आव्हान आता बचाव पथक पुढे उभा आहे.
बोरिवली–ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाला वेग; प्रकल्पासाठी बाधित कुटुंबियांना MMRDA चे तीन पर्याय
रेस्क्यू ऑपरेशन आज पण
हा अपघात झाल्यानंतर काल दुपार साडे तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे साडे सहा तास बचावकार्य करण्यात आलं. यात ४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले तर ५१ पर्यटक यातून बचावल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर कोणी सापडलं नाही, अशी तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. मात्र तरी ही खबरदारी म्हणून आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाणार आहे. सकाळी ७ वाजतापासून याला सुरवात होणार आहे. परंतु मध्यरात्री पासून सतत पाऊस पडत असल्याने बचावपथकांसमोर आव्हान आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली जखमींची भेट
कुंडमला येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर जखमींना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची रात्री उशिरा विचारपूस केली. या घटनेत प्रत्यक्षदर्शी असलेल्या तरुणांची देखील विचारपूस केली. घटनास्थळी पाहणी करून त्यानंतर त्यांनी जनरल हॉस्पिटलमधील जखमींची विचारपूस केली. यावेळी शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन स्थळीं जाताना देखील पर्यटकांनी आपली स्वतःची काळजी घेऊनच पर्यटन करावे. हुल्लडबाजी किंवा धोकादायक पर्यटन करू नये असे आवाहन देखील मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटकांना केले आहे.
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल उभारणीचा इतिहास
कुंडमळा पूलाचे बांधकाम 1990 साली सुरू झाले. त्यावेळी हा पूल स्थानिक गावांमध्ये संपर्काचा महत्त्वाचा दुवा मानला जात होता. तीन वर्षांत पूल पूर्ण झाला आणि 1993 पासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेली तीन दशके या पुलाचा वापर वाहनांसह पादचाऱ्यांद्वारे सातत्याने होत होता. पुलाच्या वापरास 30 वर्षे पूर्ण झाल्यावर, 2023 मध्ये तांत्रिक तपासणीत तो अत्यंत जीर्ण झाल्याचं स्पष्ट झालं. पुलाची रचना कमकुवत झाल्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण झाला. तपासणीनंतर प्रशासनाने पूल बंद करण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड वर्षांपूर्वीपासून सर्वसामान्य वापरासाठी पूल बंद करण्यात आला होता. मात्र काही पर्यटक अथवा स्थानिक नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं. या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यासाठी शासनाने 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रशासनाने टेंडर काढून वर्क ऑर्डर दिल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष बांधकामास अद्याप सुरुवात झालेली नाही. पावसानंतर काम सुरु होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक जण बुडाल्याची भीती