मुंबई : विकास पाठक (Vikas Pathak) उर्फ हिंदुस्थानी भाऊला (Hindusthani Bhau In Bandra Court) वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. हिंदुस्थानी भाऊच्या जामीनावर कोर्टात (Hindusthani Bhau Bail Hearing) आज सुनावणी झाली आहे. कोर्टात आणण्याआधी भाऊला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. अतिसार, डिहायड्रेशनमुळे (Dirrhea And Dehydration Problem To Hindusthani Bhau) त्याला रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली आहे. कोर्टामध्ये हिंदुस्थानी भाऊला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी राज्यातील विविध भागात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. या विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी ‘हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास फाटकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यात आत वाढ झाली आहे. आता हिंदुस्थानी भाऊला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कोठडी ४ फेब्रुवारीपर्यंत होती. आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं.मात्र त्याआधी त्याला अतिसार आणि डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान कोर्टाने हिंदुस्थानी भाऊला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती मिळाली आहे.
[read_also content=”‘मुंबई पब्लिक स्कूल’चं उद्धाटन, ‘खाजगी शाळेप्रमाणेच होणार तुलना’ : आदित्य ठाकरे https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/aditya-thackarey-opens-new-bmc-public-school-in-mumbai-nrak-233051.html”]
दरम्यान, सोमवारी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. विद्यार्थ्यांना भडकावल्याचा ठपका विकास फाटकवर ठेवण्यात आला आहे. हिंदुस्थानी भाऊच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी धारावीत हिंसक आंदोलन केले होते. त्यामुळं त्याला किमान ४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
हिंदुस्थानी भाऊ आणि त्यांच्या वतीने आपण विना अट न्यायालयात माफी मागितली आहे. असं वकील महेश मुळ्ये, हिंदुस्थानी भाऊ यांचे वकील यांनी सांगितले होते. कोणी राजकीय संस्था आहे का, आर्थिक मदत कुठून याचा तपास करायचा अशी बाजू पोलिसांनी मांडली आहे.