साहिलसोबतच्या 'शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?' जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
साहिलच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, साहिल आयआयटी मुंबईमधील त्याच्या सुरुवातीच्या मित्रांपैकी एक होता. पहिल्या वर्षात ते शेजारी-शेजारी असलेल्या खोल्यांमध्ये राहत होते आणि एकत्र बॅडमिंटनही खेळायचे. अभ्यासाव्यतिरिक्त साहिल कॅम्पस जीवनातही खूप सक्रिय होता आणि त्याला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडायचे. साहिलचा स्वभाव मनमिळाऊ होता. तो अनेकदा मित्रांना भेटायला जायचा आणि कॅम्पसमधील कॅफे व खाण्याच्या ठिकाणी वेळ घालवायचे. पहिल्या वर्षानंतरही ते दोघे संपर्कात होते.
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आमची भेट होती. भेट पूर्णपणे सामान्य होती. साहिल खाऊ घेऊन आला होता आणि दोघांनी काही वेळ एकत्र घालवला. त्यावेळी त्याच्या वागण्यावरून तो कोणत्याही मोठ्या त्रासातून जात असल्याचे दिसून आले नाही.
साहिलच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, त्याला जातीय टिप्पणी आणि मानसिक दबावाचा सामना करावा लागला. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपांची चौकशी करत आहेत.
मात्र, साहिलने मात्र कधीही त्याच्याकडे जातीय भेदभाव किंवा छळाबद्दल सांगितले नाही. आपल्याला स्वतःला साहिलच्या जातीबद्दल माहिती नव्हती आणि त्याने कॅम्पसमध्ये असे कोणतेही जातीय भेदभावाचा प्रकार पाहिला नव्हता, असा दावाही साहिलच्या मित्राने केला आहे. असे असले तरी, ही साहिलच्या मित्राची वैयक्तिक माहिती आणि अनुभव आहे. यामुळे कुटुंबीयांचे आरोप खरे किंवा खोटे ठरवले जाऊ शकत नाहीत. पोलीस सध्या या आरोपांची चौकशी करत आहेत.
साहिलच्या मित्राने प्रा. सत्यनाराणय डुल्ला यांच्याबाबतही बोलताना सांगितले की, प्राध्यापक डुल्ला हे विद्यार्थ्यांशी कठोर वागण्यासाठी ओळखले जात होते. मात्र, साहिलने त्यांच्याबद्दल कोणतीही जातिसंबंधित टिप्पणी किंवा छळाचा उल्लेख कधीही केला नाही. साहिलच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या परीक्षेच्या घटनेतील प्राध्यापक डुल्ला यांची भूमिका देखील तपासाचा एक भाग आहे.
अहवालानुसार, परीक्षेदरम्यान साहिलकडे मोबाईल फोन सापडल्यानंतर डुल्ला यांनी त्याची चौकशी केली आणि त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. नंतर काही तासांतच साहिलच्या आत्महत्येची बातमी समोर आली. या सर्व घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
साहिलला परीक्षा हॉलमधून बाहेर काढल्यानंतर त्याच्यासोबत काय झाले हे आपल्याला माहीत नाही. आम्ही दोघेही वेगवेगळ्या विभागांमध्ये होतो, त्यामुळे त्या दिवशीच्या संपूर्ण घटनांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याचेही साहिलच्या मित्राने यावेळी स्पष्ट केले.






