Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2026 | 02:52 PM
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

Follow Us
Follow Us:
  • एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण
  • राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू
  • महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी
Rajmata Jijau ST Bus News in Marathi : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली. विधानभवन प्रांगणात पार पडलेल्या बस सेवा लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दोन्ही विधामंडळाचे सदस्य, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, अशोक लेलँडचे वरिष्ठ व्यवस्थापक जॉन मॅथ्यू, टाटा मोटर्सचे ग्लोबल हेड सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीने दिला शिवसेनेला चेकमेट; नांदेडमध्ये राजकारण तापण्याची चिन्हे लागली दिसू

‘राजमाता जिजाऊ’ बस सेवा

‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सुरू करण्यात आलेली ही बस सेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी असून, राजमाता जिजाबाई यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करणारी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे 3 हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ अशा विविध सेवांचा समावेश असून, ‘राजमाता जिजाऊ’ ही बस सेवा त्या मालिकेत आणखी एक महत्त्वाची भर असणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी बसचे पूजन करून आणि फीत कापून या सेवेचा शुभारंभ केला. या बस सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास करत बससेवेची सुरूवात केली. यावेळी बसच्या समोर प्रतिकात्मक स्वरूपात घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊ यांच्या देखाव्यामुळे हा लोकार्पण सोहळा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरला.

‘राजमाता जिजाऊ’ नाव का?

परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हिंदू स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने या बसला नाव देणे, हे महाराष्ट्राच्या स्त्रीशक्ती आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान आहे. यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी, शिवशाही आणि हिरकनी यांसारख्या बसेस चालवल्या आहेत. हा उपक्रम महाराष्ट्राची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-स्नेही बनवण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरेल.

मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे; परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: Inauguration of the rajmata jijau bus service of the st corporation by chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन
1

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन

Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक
2

Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक

पत्रकारांना धमकी प्रकरण गाजलं! संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज; शिंदेंसोबतच्या बैठकीत व्यक्त केली खंत
3

पत्रकारांना धमकी प्रकरण गाजलं! संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज; शिंदेंसोबतच्या बैठकीत व्यक्त केली खंत

Corporate Jihad: ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि लैंगिक छळाविरोधात सरकार सक्त! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Corporate Jihad: ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि लैंगिक छळाविरोधात सरकार सक्त! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.