Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती

गेटवे ऑफ इंडिया येथील धक्क्यावरील जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने रेडीओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याच्या निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 21, 2026 | 07:16 PM
रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती

रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात 25 फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.

Ahilyanagar News: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी! सुजय विखे पाटलांकडून आढावा

रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईल, असेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

नवीन उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून मत्सव्यवसाय विभागाने आत्मनिर्भर व्हावे

नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधत विभागाने आपले उत्पन्न वाढवावे. उत्पन्न वाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची विनाविलंब अंमलबजावणी करावी. या स्त्रोतांमधून उत्पन्न वाढवित आत्मनिर्भर व्हावे, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. याप्रसंगी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या 85 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या विषयांची प्रगती, जमीन व्यवस्थापन व जलकिनाऱ्यांचा उपयोग धोरण याबाबतचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मत्‍स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे निधीबाबत शासनाकडील अवलंबित्व कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी निवडेलल्या पर्यायांवर काम करावे. याबाबत कालमर्यादा पाळत कार्यवाही पूर्ण करावी. उत्पन्न वाढीबरोबरच विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासात भरीव योगदान द्यावे. उत्पन्नाचे स्वत:चे स्त्रोत निर्माण झाल्यास विभागाद्वारे अधिक परिणामकारक आणि पुढाकाराने विकासाची कामे करता येतील. महाराष्ट्र किनारपट्टीसाठी जाहिरात धोरण, किनारपट्टीवरील लहान बंदराच्या हद्दीत भाडेपट्टयाने द्यावयाच्या स्टॉलबाबत अधिसूचना प्रसिद्धीची कार्यवाही पूर्ण करावी.

समुद्र किनाऱ्यालगतचे जमीन व्यवस्थापन व जलकिनाऱ्याचा उपयोग करण्याबाबत सर्वंकष, गुंतवणूकदारांना आकर्षक असणाऱ्या धोरणाची निर्मिती करावी. यासाठी जीआयएसवर आधारित पोर्टलची निर्मिती करण्यात यावी. समुद्रकिनारे लाभलेल्या अन्य राज्यांच्या धोरण, नियमांचा अभ्यास करून गुंतवणूकीस सुलभ धोरण असावे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल. प्रथम धोरण बनवून त्यानंतर पायाभूत प्रकल्पांसाठी धोरण आणावे, असे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Special Trains : नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

 

Web Title: Jetty project at radio club progressing rapidly likely to start in 2028

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • india
  • Mumbai
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Republic Day 2026: शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण
1

Republic Day 2026: शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण

आता हाजी मलंगसाठी फक्त १० मिनिटे लागणार; २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू
2

आता हाजी मलंगसाठी फक्त १० मिनिटे लागणार; २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप
3

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप

Special Trains : नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे
4

Special Trains : नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.